कोकण काव्योमहोत्सव

काव्योत्सवात अवतरणार कोकण

कोकण /साहित्य-कविता 

ठाणे : कोकण म्हटले की डोळ्यासमोर साकारते निसर्गसौंदर्याचे चित्र. कोकणची भौगोलिक रचना, साहित्यिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि कोकणची माणसं  काव्योत्सवातून सादर करण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला आहे शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकरनगर आयोजित कोकण उत्सवात.

येत्या २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सावरकर नगर येथील ठामपा शाळा  क्रमांक १२० चे मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे.आम्ही कला प्रतिष्ठानच्या ११ कवी कवयित्री यांनी या काव्योत्सवात सहभाग घेतला आहे. त्यात विनोद पितळे, रामदास खरे, विजय जोशी, डॉ सतीश कानविंदे, राजेंद्र ठाकूर, मनमोहन रोगे, डॉ प्रतीक्षा बोर्डे, मनिषा चव्हाण, आश्लेषा राजे, सुप्रिया हळबे आणि हर्षदा अमृते यांचा समावेश आहे.

कवितांसह कोकण विषयक रंजक माहिती, मालवणी कविता, गाऱ्हाणे, देवस्थाने, साहित्यिक, फळे, कोकणी इरसाल नमुने, सण-उत्सव लोककला, परंपरा, कलाकार, गडकिल्ले, समुद्र, किनारे, पर्यटन, निसर्ग संपदा, खाद्यसंस्कृती आणि समृद्धी यावर सुबक विवेचन या काव्योत्सवात होईल.या ज्ञान मनोरंजन आणि साहित्यिक कार्यक्रमास ठाणेकर रसिकांनी आणि साहित्यप्रेमी कोकणवासीयांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक बारटक्के फाउंडेशनचे संचालक, मा. नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी केले आहे.