स्व. वंदना पारसेवार यांचा द्वितीय स्मृतिदिन व पुरस्कार वितरण संपन्न

🔷 अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-  शहरातील स्व. वंदना नागनाथजी पारसेवार प्रतिष्ठानच्या वतीने स्व. वंदना यांचा द्वितीय स्मृतिदिन काल आर्य वैश्य सभागृह, नेहरू चौक येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी गुरुवर्य एकनाथ महाराज बनवसकर महाराजांचे पूजन झाले. महाराजांनी प्रभोधन पर विचार मांडले तर भानुदास वट्टमवार यांनी समाजास मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास डुबे,आर्य वैश्य महासभेचे बांधकाम विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदासजी वट्टमवार,-पुणे, गोविंद बिडवई- नांदेड,अन्नपूर्णा नित्यसत्रम चे बच्चू विलास गुप्ता, वैश्य महासभेचे जिल्हा अध्यक्ष सुमितजी रुद्रवार, तसेच आर्य वैश्य महिला महासभेच्या बीड जिल्ह्याच्या अध्यक्षा प्राजक्ता गुंडेवार, असे अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व वंदनाताई, वासवीमाता व रंगनाथ महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव डुबे यांनी केले. प्रास्ताविकानंतर वंदनाताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.वंदनाताईचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मार्गदर्शिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने समाजाप्रती खूप योगदान असणारे प्रदीप सोपानराव कोकडवार यांना आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आदर्श शिक्षक सचिन वसंतराव लादे पंढरपूर यांचा सन्मान करण्यात आला. ज्या सहकाऱ्यांन सोबत पंचवीस तीस वर्षे ज्या शाळेत शिक्षिका म्हणून सेवा केली आणि वंदनाताईंनी त्यांच्या शालेय सेवा काळात अनेक विद्यार्थी घडवले.अशा अनेक विद्यार्थ्यांचे कौतुक यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास आर्य वैश्य समाजातील परळी, सोलापूर, धारूर, केज, पंढरपूर, सोनपेठ, परभणी, आदी ठिकाणचे समाज बांधव, शहरातील इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या, वंदना पारसेवार यांचे तत्कालीन विद्यावर्धिनी शाळेचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष विकासदादा डुबे यांनी तर आभार डॉ. सचिन लादे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्व. वंदना ना. पारसेवार प्रतिष्ठान परळीचे सर्व सदस्य,आर्य वैश्य युवक मंडळ परळी, आर्य वैश्य महिला मंडळ परळी, आर्य वैश्य विश्वस्त मंडळ परळी, तसेच आर्य वैश्य महासभा बीड जिल्हा कार्यकारिणी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. सुनीता दिक्कतवार, कोंमावार व प्रमोद बिडवाई यांनी केले.