साखर कारखान्यानी ऊसतोड कामगारांना त्वरित आर्थिक मदत द्यावी- प्रा.टी.पी.मुंडे 

अवकाळी पाऊस-ऊसतोड कामगारांच्या व्यथा

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क–  दोन-चार दिवसापासून जी गारपीट आणि अवकाळी पाऊस चालू आहे त्यामध्ये शेतक-यांचे मोठे नुक्सान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नुकसान ऊसतोड कामगारांचे झाले आहे. या गारपिट, अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोबत असलेले उपजीविकेच्या सामान खराब झाले आहे. ऊसतोड कामगार व त्यांची मुले बाळे आजारी पडली आहेत.तेंव्हा ऊसतोड कामगारांच्या जोडीला सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी ताबडतोब कामगारांच्या जोडीला पंचवीस हजार मदत देण्याची मागणी केल्याची माहिती प्रा टि.पी. मुंडे यानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अवकाळी पाऊस, गारपीट मुळे शेतकऱ्यांना सोबतच ऊसतोडणी कामगारांच्या ही अडचणी वाढल्या आहेत, उपजीविका भागवण्यासाठी खायला अन्न नाही त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. आजारी पडलेल्यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसा नाही, म्हणून सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी ताबडतोब दोन कोयत्याला (जोडीला) कारखान्यानतर्फे २५ हजाराची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. मी स्वतःनजीकच्या ठिकाणी जाऊन कामगारांना आवश्यक अन्न धान्य दिल्या त्यांनी सांगितले.
ते पुढें म्हणाले की महाराष्ट्र राज्याच्या मा. मुख्यमंत्री साहेबांना मी आवाहन करतो की आपण त्या संबंधित अशा सर्व साखर कारखान्यांना तातडीने आदेश द्यावा अशी मी मागणी करतो. मला अनेक कारखान्यांवरून ऊसतोड कामगारांचे फोन आले की सर आम्ही संकटात आहोत आम्हाला काहीतरी मदत करा   दरम्यान मी परळीच्या जवळ असलेल्या मांडेखेल या गावी सायखेड़ा साखर कारखाना (टी-20 शुगर) व गंगाखेड शुगर साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यांच्या ऊसतोड कामगारांच्या भेटी घेतल्या त्यांचे दुःख वेदना किंकाळ्या ऐकल्या आणि त्यांचे दुःख जाणून घेतले आहे म्हणून ऊसतोड कामगारांना महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब, साखर कारखान्यांचे अध्यक्ष (चेरमन), साखर महासंघाचे अध्यक्ष, व साखर आयुक्त यांना मी वरील प्रमाणे मागणी केली आहे त्या सर्व ऊसतोड कामगारांना त्वरित आर्थिक मदत द्यावी असे मी आवाहन करत आहे. या पत्रकार परिषदेत विनायक गडदे, विजय मुंडे सह अनेक पत्रकार उपस्थित होते.