जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण रँली संपन्न

🔷 उपजिल्हा रुग्णालय व लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने रँलीचे आयोजन

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-  दि.०१-
उपजिल्हा रुग्णालय व लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त शुक्रवारी (दि.०१) एड्स जनजागरण रँलीचे आयोजन करण्यात आले होते. रँली उत्साहात संपन्न झाली.
जागतिक एड्स दिन जगात सर्वत्र साजरा केला जातो. शहरात उपजिल्हा रुग्णालय व लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रँलीचे आयोजन शुक्रवारी (दि.०१) करण्यात आले होते. सकाळी १०.३० वाजता उपजिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय अधिक्षक डॉ गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे, प्राचार्या विद्या देशपांडे, शरद चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रँलीची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील विष्णू मुंडे, डॉक्टर, नर्ससह कर्मचारी उपस्थित होते. ही रँली घोषणा देत रोडे चौक, बाजारसमिती, स्टेशन रस्ता, राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक ते महिला महाविद्यालयात संपन्न झाली. यावेळी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात रेड रिबन क्लबचे उद्घाटन प्राचार्या विद्या देशपांडे व शरद चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. रँलीस संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.प्रविण फुटके, प्रा.विना पारेकर, प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा प्रविण नव्हाडे,प्रा.विशाल पौळ,प्रा अशोक पवार, प्रा राठोड, हेमलता दुधाटसह स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.