परळीत राम कथेचा दुसरा दिवस

बीड /परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – शहरातील वैद्यनाथ मंदिरा वाहनतळ या ठिकणी दि.२ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. राम कथा कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून सद्‌गुरू श्री गोंदवलेकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने रामकथाकार रवींद्र पाठकांनी या आधी २०५ निरुपण मनोबोधावर, ८०० निरुपण दासबोधावर आणि १३०० रामचरित मानस या ग्रंथावर आधारित निरुपण केली आहेत.

देशभरातील  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र नगरीतील महाशिवरात्री महोत्सव हा देशभरात प्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्र असल्याने सातत्याने विविध कथा, प्रवचन, धार्मिक उपक्रम, सप्ताह आदी आयोजित केले जातात. प्रभू-वैद्यनाथाच्या दर्शनासाठी शेजारील राज्यासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असून या या रामकथे साठी राज्यातील अनेक जिल्ह्यातील भाविक उपस्थित झाले आहेत.

सदर कथा सोमवार पासून रोज सकाळी ९.३० ते १२ आणि संध्याकाळी ५.३० ते ८ या वेळेत रामकथा मानस रामनिवास होईल. कथास्थळी श्रोत्यांसाठी भोजन, प्रसादाची व्यवस्था केली आहे. सर्व १२ ज्योतिर्लिंगामध्ये महादेवाच्या चरणी रामकथा निरुपणाच्या संकल्पातील ही पाचवी रामकथा होत आहे. भाविकांनी कथेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.