उत्तर भारतात भाजपचे पुन्हा वर्चस्व

निवडणूक

संपूर्ण उत्तर भारत  हिमाचल वगळता झाला काँग्रेसमुक्त

नवी दिल्ली – छत्तीसगड,राजस्थान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत केंद्रात  सत्तेत  आसलेल्या  भारतीय जनता पक्षाने  घवघवीत  यश मिळवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप या राज्यांतील बहुतांश जागा सहज मिळवेल  असा दावा केला जात आहे. भाजपच्या या कामगिरीमुळे संपूर्ण उत्तर भारत काँग्रेसमुक्त होईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण, या भागात काँग्रेसकडे केवळ हिमाचल प्रदेश हे एकमेव राज्य उरले आहे.

छत्तीसगड,मध्य प्रदेश,राजस्थान,व तेलंगणा या 4 राज्यांतील निवडणुकीकडे ट्रायल  लोकसभा निवडणूक म्हणून पाहिले जात होते. या 4 पैकी 3 राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आली. तर तेलंगणा या एकमेव राज्यांत काँग्रेसचा विजय झाला. या 4 राज्यांत लोकसभेच्या 82 जागा आहेत. यात राजस्थानात 25, मध्य प्रदेशात 29, तेलंगणात 17 व छत्तीसगडमध्ये 11 जागा आहेत. त्यामुळे या सर्वच जागांवर भाजपचा विजय होईल असा दावा आता केला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उपरोक्त 4 राज्यांतील 82 पैकी 66 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यात राजस्थानातील सर्वच 25 जागा भाजपने जिंकल्या होत्या तर मध्य प्रदेशातील 28, तेलंगणातील 4 व छत्तीसगडमधील 9 जागा भाजपने जिंकल्या होत्या.

उत्तर भारतात  काँग्रेसला पिछाडी 

उत्तर भारतात आतापर्यंत छत्तीसगड,राजस्थान, व हिमाचल प्रदेश या 3 राज्यांत काँग्रेसचे सरकार होते. पण या निवडणुकीत या 3 पैकी 2 राज्यांत काँग्रेसला पराभवाची चव चाखावी लागली आहे. यामुळे हिमाचल प्रदेश वगळता संपूर्ण उत्तर भारतात कॉँग्रेस चा प्रभाव घटला आहे. या निकालाचा  परिणाम आगामी सार्वत्रिक निवडणुकांत होऊन त्याचा लाभ भाजपला होऊ शकतो असाही अंदाज लावला जात आहे.  उत्तर भारतात मोदींची मोठी छाप  जबरदस्त आहे. त्यामुळे जनतेने त्यांच्यामागे उभे राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. हे तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. भाजपने दक्षिण भारतात जिवाचे रान केले. पण लोकांनी त्यांना नाकारले हे आजच्या निकालातून स्पष्टपणे दिसत आहे.