Indian Navy Day :Indian Navy Day Celebration In Sindhudurg
महाराजांचे आरमार
भारतीय नौदलाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ४ डिसेंबर रोजी नौदल दिन -नेवि डे होतो साजरा
मुंबई: भारतातील नौदलाचा देशातिल पहिला नौदल दिन -नेव्ही डे (Indian Navy Day) साजरा झाला तो 1944 साली. स्वातंत्र्यापूर्वी 21 ऑक्टोबरला नौसेना दिवस साजरा करण्याची पंरपरा होती. स्वातत्र्यानंतर डिसेंबर महिन्यात नौसेना दिन साजरा होऊ अधिक बदल होत 1972 सालापासून दरवर्षी 4 डिसेंबरला नेव्ही डे साजरा केला जातो.
पाकिस्तानने 3 डिसेंबर 1971 साली आपल्या देशाच्या सीमेवर हल्ले करुन युद्ध छेडलं. पाकिस्तानच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाने 4 डिसे VIEW IN APP ऑपरेशन ट्रायडंट राबवलं. या ऑपरेशन ट्रायडंट द्वारे आपल्या नौदलाने पाकिस्तानच्या नौदलाचं कंबरडं मोडलं आणि पाकिस्तानला नामोहरम केलं. या युद्धात भारताला मिळवलेल्या यशाला सलाम आणि त्याचं स्मरण म्हणून 1972 सालापासून 4 डिसेंबरल दिवस साजरा होऊ लागला.
भारतीय नौदलाच्या आक्रमक हल्ल्याने पाकिस्तान नौदलाची फक्त जहाजंच नाही तर अनेक ऑईल टँकर्सही उद्धस्त झाले. भारतीय नौदलाच्या आक्रमणाने कराची बंदरातील इंधन साठा उद्ध्वस्त झाल्याने पाकिस्तानच्या नौसेनेचं कंबरडं मोडलं आणि भारताने मोठा विजय मिळवला.सामर्थ्याचा अभिमान म्हणून दरववर्षी 4 डिसेंबर नौदल दिन म्हणून साजरा होतो.यंदाचा नेव्ही डे भारतीय नौदलाचे जनक असा ज्यांचा अभिमानाने उल्लेख होतो त्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रम आणि सामर्थ्याचं प्रतिक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं साजरा झाला.
नेव्हीचा नवा लोगो शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेणारा- मराठा साम्रज्याची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी सागरी आरमाराची उभारणी करणारे आद्य संस्थापक म्हणून शिवरायांची ओळख असल्याने शिवराय भारतीय नौदलासाठी सर्वात मोठे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत.भारतीय नोसेंनेच्या ध्वजात काळानुरुप त्यात बदलही होत राहिले . पण गेल्या वर्षी भारतीय नौदलाने देशाच्या सागरी आरमाराचे जनक छत्रपती शिवरायांपासून प्रेरीत होत आपल्या झेंड्यात आणि लोगोत गौरवास्पद बदल केले. नौदलाची शान असलेला नवा झेंडा आणि त्यावरचा नेव्हीचा लोगो छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेणारा आहे.
नौदलाच्या झेंड्यावरचा निळा अष्टकोनी आकार आठ दिशांचं प्रतिनिधीत्व करतो. आठही दिशांनाभारतीय नौदलाचा दबदबा कायम राहो ही भावना या अष्टष्टकोनी आकारातून प्रतित होते. या लोगोवर असलेलं अँकरचं चिन्हं स्थिरता दर्शवतं.त्यामुळे महाराष्ट्रासह देशाचा स्वाभिमान आणि अभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करुन आणि सिंधुदुर्गाच्या, राजकोट किल्ल्याच्या साक्षीनं पार पडलेला नौसेना दिनाचा सोहळा खरोखरचं ऐतिहासिक म्हणावा लागेल.
महाराजांचे छायाचित्र श्री.विनोद जाधव यांच्या ब्लॉग वरुण साभार.