🔷 काही भागात सुमारें तीन दिवस वीज नाही, इंटरनेट बंद; 🔷 हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्न पाणी.
चेन्नई– देशभरातील वातावरणात, तापमान मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ 2 डिसेंबर रोजी उदयास आले. मिचाँग नावाचे हे चेन्नई कडून येतांना त्याने प्रचंड नुकसान केले.दरम्यान चेन्नई मध्ये या वादळाने सुमारे 50 सेंमी पाऊस झाला.पुढें मिचोंग चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकले.
गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे अनेक भाग पुरात बुडाले आहेत. अनेक भागात ७२ तास वीज नाही. इंटरनेट बंद आहे. भारतीय हवाई दलाच्या मदतीने हेलिकॉप्टरद्वारे पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे.तामिळनाडूतील वादळामुळे राज्यात 2 दिवसांत मोठा पाऊस पडला. चेन्नई शहरातील काहीभाग पाण्यात बुडाले आहेत. या वादळी पावसात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील आपत्तीत आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
मिचाँग चक्रीवादळ बुधवारी तेलंगणात पोहोचल्याने कमकुवत झाले. आंध्र प्रदेशातील नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान बापटलाजवळ कमकुवत झाले. देशात दुसरीकडे चक्रीवादळामुळे ओडिशात पाऊस पडत आहे.तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसाच्या काळात वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.