चित्रकार दिग्विजय कुंभार यांचे “पद्म” हे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर कलादालनात

🔷🔸कला विश्व -कलावंत 

🔷 Digvijay Kumbhar-दिग्विजय कुंभार

मुंबई- तुळजापूर येथील अतिशय अभ्यासू आणि संवेदनशील  चित्रकार दिग्विजय कुंभार यांचे जहांगीर कलादालनात “पद्म” -Being lotus -कमळ हे चित्र प्रदर्शन दर्दी कलारसीकांच्या गर्दीने फुलले आहे. दिग्विजय कुंभार या चित्रकाराचे “पद्म” हे एकल चित्रप्रदर्शन सध्या जहांगीर कलादालनात सुरु आहे.

कमळ विषयातील सुंदर कमळ चित्रे  कुंभार यांनी अतिशय हळुवार पणे  निर्मिली आहेत . या पूर्वी कुंभार यांची दिल्ली , राजस्थान , गुजरात , आदि ठिकाणी प्रदर्शने झाली आहेत. त्यांच्या कमळ कलाकृती म्हणजे चित्ता आकर्षक रंगसंगती, निसर्गाचे सूक्ष्म निरिक्षण, निसर्गावरील त्याचे प्रेम आणि भाव-भावनांचा मिलाप आहे.

या चित्रप्रदर्शनास नुकतीच प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे,ललित कला अकादमी दिल्ली चे अध्यक्ष शिल्पकार डॉक्टर उत्तम पाचरणे, प्रा. राजेंद्र पाटील आदि सह अनेक मान्यवरानी भेट दिली आहे . चित्रांसाठी प्रोत्साहित करणारे वडील कै. दत्तात्रय कुंभार यांना हे चित्र प्रदर्शन समर्पित करण्याचे ही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं.

“पद्म”  हे चित्रप्रदर्शन कला रसिकांना  ११ डिसेंबर पर्यंत रोज सकाळी ११ ते संध्या ७ वाजे  पर्यंत पाहता येईल
स्थळ – जहांगीर कलादालन, काळा घोडा,मुंबई .