टीईटी घोटाळा : एसीबी’कडून तुकाराम सुपेसह इतर तीन अधिकाऱ्यांविरुद्ध ‘गुन्हा

(टीईटी) घोटाळा / शिक्षण  विभागातील भ्रष्ट मार्ग

गुन्हा दाखल शिक्षण वर्तुळात खळबळ : वैध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न
पुणे : वैध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार व सांगलीचे निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे याच्याविरुद्धही या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. एकाच वेळी तीन आजी-माजी शिक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘टीईटी’ परीक्षेतील गैरव्यवहाराबाबत तुकाराम नामदेव सुपे (५९, रा. पिंपळे गुरव, पुणे) सध्या येरवडा कारागृहात कैदेत आहे. त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सुपे याने १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे परीक्षण करून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुपे याच्याविरोधात पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात दोन कोटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपये रोकड आणि ७२ लाख रुपये किमतीचे १४५ तोळे सोने

…………………………………………… ……………………………………

लोहार याच्याकडे सापडले साडेपाच कोटींची मालमत्ता –सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना २५ हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झालेल्या तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण आनंदा लोहार आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांच्या किमतीची भ्रष्ट मार्गाने जमवलेली मालमत्ता आढळून आली आहे.

सोलापूर येथे ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक लुमाकांत महाडिक यांनी, सोलापूर सदर बझार पोलीस ठाण्यात किरण लोहार (५०), त्याची पत्नी सुजाता किरण लोहार (४४), मुलगा निखिल किरण लोहार (२५, शिक्षक कॉलनी पाचगाव, कोल्हापूर) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, सोलापूर येथील पोलिसांचे एक पथक कोल्हापुरातील पाचगाव येथील शिक्षक कॉलनी येथील लोहार यांच्या निवासस्थानी तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.