सामाजिक बदल –
या रिलेशन पद्धतीने घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीय वाढले,
नवी दिल्ली : वृत्तसेवा- सद्य स्थितीत देशभरात विवाहा शिवाय एकत्र राहणे लिव इन रिलेशन्स हा प्रकार शिक्षित -अ शिक्षित तरुणात मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. विवाह न करता स्त्री-पुरुषांच्या एकत्र राहण्याच्या लिव्ह इन रिलेशनशिप पद्धतीवर बंदी घातलीजावी, अशी मागणी आज प्रथमच लोकसभेमध्ये झाली. विवाहा शिवाय एकत्र राहणे हा अतिशय धोकादायक प्रकार समाजात वाढीस लागला आहे. समाजातून तो नष्ट करण्यासाठी सरकारने कायदा करावा. तसेच प्रेमविवाहांसाठी देखील माता-पित्यांची संमती बंधनकारक करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे हरियाणातील खासदार धरमवीर सिंह यांनी केली.
लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना धरमवीर सिंह म्हणाले, की प्रेमविवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे. प्रेम, शारीरिक आकर्षण, हे लिव इन रिलेशन मध्ये आहोत अस म्हणण्याची पहिली पायरी प्रकारा मुळे काही काळा नंतर आकर्षण संपले की वाद झाल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे अशा संबंधांसाठी वधू- वरांच्या पालकांची संमती बंधनकारक केली जावी. जुळविल्या जाणाऱ्या विवाहांची भारतात प्रदीर्घ परंपरा आहे. समाजातील एक मोठा वर्ग अजूनही पालक किंवा नातेवाइकांनी घडवून आणलेल्या विवाहांनाच मान्यता देतो.
यामध्ये वधू-वरांची संमती, सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये कौटुंबिक पार्श्वभूमी यांसारख्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. भारतात घटस्फोटाचे प्रमाण केवळ १.१ टक्का आहे, तर अमेरिकेत हे प्रमाण सुमारे ४० टक्के आहे. जुळविलेल्या विवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण फारच कमी आहे. मात्र अलीकडे घटस्फोटाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे असून प्रेमविवाह त्यामागचे मुख्य कारण आहे, असाही दावा
भाजप खासदाराने केला.
प्रेमविवाह करताना वडिलांची वधू-वरांच्या संमती असावी. सोबतच लिव्ह इन रिलेशनशिपवरदेखील बंदी घालणारा कायदा तयार केला जावा, या मागणीचाही भाजप खासदाराने पुनरुच्चार केला.