नोकरीचा भ्रष्ट मार्ग
राज्यातील वनरक्षक पदासाठी दोन उमेदवारांनी मोडला उसेन बोल्टचा विक्रम! वनरक्षक पदासाठी उर्मिला नावाच्या उमेदवाराने २०० मीटरची शर्यत १४.०७ सेकंदांत आणि उज्ज्वलने १९.६ सेकंदांत पूर्ण केली, तर बोल्टचा
विक्रम १९.१९ सेकंद आहे.
रायपूर : वृत्तसंस्था –अवैद्य मार्ग, ओळख, वशिला पदाचा वापर करून नातलगानची सरकारी उपजिल्हाधिकारी याचा छत्तीसगड राज्यातील सरकारी भरतीमध्ये मोठा घोळ करण्यात आला आहे. राज्यात परवापरवापर्यंत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचे पुढारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मिळून तब्बल १८ जवळच्या नातेवाइकांची निवड उपजिल्हाधिकारी पदी झाली. प्रकरण सध्या न्यायालयात असून, भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. आता राज्यात
नव्याने आलेले भाजप सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते, त्यावर अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.
गत सरकारच्या काळात परीक्षांमध्ये झालेला भ्रष्टाचार सीजी-पीएससीपुरता मर्यादित नाही. इतर नोकऱ्यांमध्येही हाच
गोरखधंदा झालेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील धावपटू राहुल याने २० मे २०२३ रोजी कावर्धा येथे वनरक्षक पदासाठी
परीक्षेसह शारीरिक चाचणी दिली. निकालाअंती अन्य २ जणांनी २०० मीटरमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू उसेन बोल्टचा विक्रम मोडलेला होता! विषय चव्हाट्यावर आला आणि परीक्षा रध झाली.
राज्यात अनेक महत्व पूर्ण जागा भरती मध्ये जसे प्लाटून कमांडर, शिक्षक भरती आणि पोलीस भरती अशा सर्व प्रकारांमध्ये सरकारमधील घटकांनी हेच कित्ते गिरविले. भाजपने वेळोवेळी या प्रकारांविरोधात निदर्शनेही केली होती. निवडणुकीतही हा मुद्दा परिणामकारक ठरला. २०२१ च्या सीजी-पीएससी निकालाअंती तेव्हा काँग्रेस नेते आणि अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची निवड झाल्याचे समोर आले होते. २०२२ च्या निकालानंतर उत्तरपत्रिका तपासणीत अनियमितता झाल्याचा आरोप झाला होता. २०२१ च्या सीजी-पीएससी परीक्षेचा अंतिम निकाल ११ मे २०२३ रोजी जाहीर झाला. या यादीत १७० उमेदवारांची नावे होती. यात सीजी-पीएससीचे तत्कालीन अध्यक्ष तमनसिंग सोनवणी, सचिव अमृत खालको यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांची मुले, मुली आणि निकटवर्तीयांना उपजिल्हाधिकारी आणि डीएसपीसारख्या पदांवर भरती करण्यात आले. भाजप नेते नानकी राम कंवर यांचे वकील संजय अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
• नेत्यांची उदाहरणे
• काँग्रेस नेते सुधीर कटियार यांची मुलगी भूमिका हिची उपजिल्हाधिकारी आणि जावई शशांक गोयल याचीही उपजिल्हाधिकारीपदी निवड. काँग्रेस नेते राजेंद्र शुक्ला यांची कन्या स्वर्णिम
शुक्ला हिची उपजिल्हाधिकारीपदी निवड.
• अधिकार्यानी मूल, मुली, पुतण्या, यांची वर्णी लावली – पीएससी चेअरमन तमनसिंग यांचे नातेवाईक
नाव नाते पद
नितेश मुलगा उप जिल्हाधिकारी
निशा सून उप जिल्हाधिकारी
दीपा भावाची सून जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी
सुनीता भाची कामगार अधिकारी
साहिल पुतण्या डीएसपी
…………………………………….. .. ………………………………………….
• पीएससी आयोगाचे सचिव खालको यांचे नातेवाईक
नाव नाते पद
नेहा मुलगी उपजिल्हाधिकारी
निखिल मुलगा उपजिल्हाधिकारी
सुमित नातेवाईक उपजिल्हाधिकारी