महाराष्ट्रातील वैद्यनाथ हेच ज्योतिर्लिंग, याची अस्मिता जपली पाहिजे , राज्याच्या अनेक भागातील श्रद्धाळू शहरातच आठ दिवस मुक्कामी
गोंदवलेकर महाराजांच्या रामनाम – अन्नदान सूत्राचे चैतन्य गौशाळेकडून तंतोतंत पालन
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क – तीर्थक्षेत्र परळीचे वैद्यनाथ हेच ज्योतिर्लिंग आहे, झारखंड चे बैद्यनाथ हे धाम असल्याने वंदनीय आहे.असा निर्वाळा सुप्रसिध्द रामकथा निरुपणकार प.पु.रविंद्र पाठक यांनी रामकथेत केला.चैतन्य गौशाला ट्रस्ट पुणे द्वारे बारा ज्योतिर्लिंगांत पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या नगरीत मानस रामनिवास श्रीराम कथेचे भव्य आयोजन करण्यात आले होते या कथेचा समारोप राविवारी झाला.चैतन्य गौशाळा ट्रस्टने कडून गोंदवलेकर महाराजांच्या रामनाम – अन्नदान या सूत्राचे तंतोतंत पालन करत नऊ दिवस जणू काही महायज्ञच केल्याचे पहावयास मिळाले.
ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पावन भूमीत दि.2 ते 10 डिसेंबर या काळात या रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. कथा एकण्यास राज्याच्या अनेक भागातील श्रद्धाळू शहरातच आठ दिवस मुक्कामी होते. या बरोबरच परळी तालुक्यातील अनेक भक्त नित्य उपस्थित होते.
ज्योतिर्लिंग हे काही विशिष्ट प्रयोजनासाठी निर्माण झालेले असते.महाराष्ट्रातील परळी येथील वैद्यनाथ हेच ज्योतिर्लिंग आहे झारखंड मधील बैद्यनाथ हे धाम आहे.त्या ठिकाणी महादेव – पार्वती विश्राम करतात म्हणून ते धाम आहे.आपल्या महाराष्ट्रातील वैद्यनाथ हेच ज्योतिर्लिंग आहे.आपणच आपल्या ज्योतिर्लिंगाची अस्मिता जपली पाहिजे असे आवाहन कथावाचक रविंद्र पाठक यांनी यावेळी केले.मानव निर्माण करतो तो ग्रंथ आहे रामचरित मानस आहे असेही ते म्हणाले.
कथेच्या समारोपदिनी कथावाचकांनी रामचिरत मानस मधील चौदा स्थानाचा महिमा विशद केला.रामचरीत हे भरताशिवाय अपूर्णच आहे,मनुष्याला कर्तव्य कार्य करायला भाग पाडते.सेवक म्हणवणे व सेवा धर्माचे पालन करणे यामध्ये मोठा फरक आहे.सात्विक अहंकार मनुष्यासाठी घातक असतो रक्तात असलेल्या कर्करोगाप्रमाणेच काम करतो. कथेचे पुढे विवेचन करतांना संत प्रत्येकाला राम सन्मुख करण्याचे कार्य करत असतो. स्वतः जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भक्तीमुळे भगवंतालाही दास व्हावे लागले ही भक्तीची ताकद असून कामना विरहित भजन केल्यावरच भगवंताची प्राप्ती होते असे समारोपदिनी प.पु.पाठक गुरूजी म्हणाले.
…………………………
गोंदवलेकर महाराजांच्या रामनाम – अन्नदान सूत्राचे चैतन्य गौशाळेकडून तंतोतंत पालन –
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आयुष्यभर रामनाम – अन्नदान या द्विसूत्रावर काम केले.हेच कार्य चैतन्य गौशाळा ट्रस्टने वैद्यनाथाच्या भूमीत नऊ दिवस निरंतर केले.मानस रामनिवास कथेच्या माध्यमातून अखंड रामनामाचा जप प.पु.महाराजांनी करवून तर घेतलाच शिवाय नऊ दिवस दोन्ही वेळेला कथेनंतर अन्नदानाचा महायज्ञच केल्याचे अनुभवायला मिळाले.
ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी येथे संगीतमय रामकथा श्रवणासाठी परिसरातील भाविकांसह श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शिष्यपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.