कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी केले अभिवादन

नागपूर –माजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते, स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे कृषिमंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी आज नागपूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

स्व.मुंडे साहेबांना धनंजय हे ‘अप्पा’ म्हणत, त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, आज भावुक होत धनंजय मुंडे यांनी स्व.मुंडे साहेब हे शेतकरी-कष्टकरी, दीन दुबळ्यांचे आधार होते, जनसेवेचा त्यांचा ध्यास मनात व कार्यात मीही जोपासत आहे, असे म्हणत स्व.गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण केली आहे.