सबसे कातील गौतमी पाटीलच्या घुंगरू चित्रपट आज होणार प्रदर्शित

मराठी चित्रपट- मनोरंजन

🔷 राज्यातील 105 चित्रपट गृहांतून होणार रिलीज; प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-  संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याच्या तालावर नाचायला लावणारी गौतमी पाटील लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तिचा जोरदार अभिनय असलेला चित्रपट घुंगरू एक संघर्ष…. आज महाराष्ट्रभरात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली पहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास 105 चित्रपट गृहांत हा चित्रपट एकाचवेळी चालवला जाणार आहे अशी माहीती चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता बाबा गायकवाड, निर्माता आणि अभिनेता डॉ.अजित केंद्रे, क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रशांत तोतला, निर्माता श्रीमंत ढाकणे, अभिनेता श्रीकृष्ण ढाकणे, अभिनेत्री उषा चव्हाण, सुदाम केंद्रे यांनी दिली आहे.

लोककला केंद्र, तमाशा आणि स्टेज शोमध्ये नृत्य करणाऱ्या महिला कलाकारांची पडद्यामागची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यांची सत्य कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना पहायला मिळणार आहे. हा चित्रपट राज्यातील 105 चित्रपट गृहांतून आज 15 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह, पंजाब, केरळ, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या सहा राज्यात करण्यात आले असून, वेगवेगळ्या सहा भाषांमध्ये हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. गौतमी पाटीलचा अभिनय यात असल्याने तीच्या अभिनयाची उत्सुकता राज्यातील लाखो प्रेक्षकांना लागलेली आहे. आजपर्यंत प्रेक्षकांनी गौतमीच्या कातील अदा फक्त स्टेजवरच पाहिल्या होत्या, मात्र या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना तीचा अभिनयसुध्दा पहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता, आज या चित्रपटाचे प्रदर्शन राज्यभरात करण्यात येत आहे.