परळी येथे कर्मचाऱ्यांचा संपास प्रतिसाद

🔷 सिंचन व तहसील कार्यालय येथे निदर्शने करून उपजिल्हाधिकारी यांना दिले मागण्याचे निवेदन.

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-   राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी करत गुरुवार दि 14 पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.राज्यात ठिकाणी निदर्शने व आंदोलने करण्यात येत असून परळी शहर व तालुक्यातील सर्वच शासकीय कर्मचारी यांनी एकजूट दाखवीत या बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.शहरातील सिंचन व उपविभागीय कार्यालय येथे आपल्या मागण्याचे निवेदन यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिले.

जुन्या पेन्शन करिता राज्यभर सुरू असलेले काम बंद आंदोलनाला परळी शहर व तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. याशिवाय आरोग्य सेवेतील कर्मचारी सुद्धा संपात सहभागी झालेले आहेत.यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येत उपविभागीय कार्यालय परळी येथे निदर्शने करत प्रशासनास आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

यावेळी महसूल कर्मचारी संघटना बीड जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी कचरे, शिक्षक संघटनेचे बंडू अघाव, अशोक मस्कले, एकनाथ लांडगे, राजेश्वर निला, बापुराव खोतपाटील,महसूल विभागाचे विष्णू गित्ते,सचिन साबळे, तलाठी, अनिल गवळी, महसूल सहाय्यक, वाशिम शेख, महसूल सहाय्यक, सुरज शिंदे, महसूल सहाय्यक, जलसंपदा विभागाचे विनोद मिसाळ (विभागीय सचिव महाराष्ट्र रेखाचित्र संघटना संभाजीनगर विभाग), शशांक दामोशेन, प्रथम लिपीक, बंडू काळे, वरिष्ठ लिपीक कृषी विभागाचे दीपक देशमुख, कृषी सहाय्यक, शंकर गव्हाणे, कृषी सहाय्यक, चाळक कृषी सहाय्यक आदी सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.