मराठी चित्रपट घुंगरू पहिल्या दिवशी चार शो हाउसफुल

पो.नि हेमंत कदम व ज्येष्ठ पत्रकार धनंजय आरबुने आदि मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ.

महाराष्ट्रात सुमारे 105 चित्रपटगृहात आज एकाच वेळी प्रदर्शित.

बीड /परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क -शहरातील  गुणवंत कलाकारांची निर्मिती असलेल्या घुंगरू मराठी चित्रपट आज महाराष्ट्रात सुमारें 105 चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. त्याला आज भरघोस ओपनिंग मिळाले. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अदाकारीने वेड लावणाऱ्या आणि आपल्या ठुमक्यावर थिररकवणाऱ्या प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील ची यात मुख्य भूमिका आहे. दि.15 डिसेंबर रोजी परळी शहरातील श्री चित्रमंदिर येथे या चित्रपटाचा शुभारंभाचा पहिला खेळ दणक्यात संपन्न झाला. दरम्यान या चित्रपटाचे दिवसभरातील चारही शो हाउसफुल झाले आहेत.

या चित्रपटाचा प्रारंभी परळीतील कलाकारांनी शहरात मोठी फेरी काढून वाजत गाजत परळी शहरातील श्रीनाथ चित्रमंदिर येथे येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढऊन तिकीट विक्रीस सुरुवात केली. प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामीण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर, पत्रकार जेष्ठ धनंजय आरबुने, पत्रकार जगदीश शिंदे आदिसह या चित्रपटातील कलाकार तसेच अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पूर्वी गावोगाव यात्रा जत्रा महोत्सव या माध्यमातून आपल्या कला सादर करणाऱ्या तमाशा फड आता नामसेस झाले आहेत. लोककला, तमाशा, आणि स्टेज शो करणाऱ्या कलावंतांची मोठ्या प्रमाणात दैना झाली आहे.कलावंतांची मोठी कुचंबणा होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक लेखक आणि अभिनेता बाबा गायकवाड असून परळीतील डॉ. अजित केंद्रे, कल्पक दिग्दर्शक प्रशांत तोतला, श्रीमंत ढाकणे, अभिनेता श्रीकृष्ण ढाकणे अभिनेत्री उषा चव्हाण, सुदाम केंद्रे, आदींच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह गोवा आंध्र प्रदेश केरळ, पंजाब राजस्थान अधिभागात पार पडले आहे. हा चित्रपट सहा भाषांत वितरित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक प्रशांत तोतला यांनी दिली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सुमारे 105 चित्रपटगृहात हा चित्रपट आज एकाच वेळी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसाचे चारही खेळ सर्वत्र हाउसफुल असल्याची माहिती मिळते आहे.