संसद घुसखोरीतील 6वा आरोपी ताब्यात.

राष्ट्रीय-

नवी दिल्ली- शनिवारी, 16 डिसेंबर रोजी लोकसभा घुसखोरीप्रकरणी सहाव्या आरोपीलाही अटक करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. पोलिसांनी अद्याप त्याचे नाव उघड केलेले नाही. 13 डिसेंबर रोजी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील ललित झा याने दि.14 डिसेंबरच्या रात्री आत्मसमर्पण केले होते.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारलेल्या सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी एक-दोन नव्हे तर 7 स्मोक कॅन (धूर पसरवण्याचे उपकरण) नेले होते.

इंटरनेट वर गुगलच्या माध्यमातून आरोपींनी संसदेच्या आजूबाजूच्या परिसराची रेकी केल्याचे करत सुरक्षा व्यवस्था कशी असते या साठी जुने व्हिडिओही पाहिले, संसदेत प्रवेशासाठी पूर्ण तयारी केली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसात बोलण्याचा मार्गही शोधून काढला होता, त्यामुळे पोलिसांना पकडता आले नाही. सर्व आरोपी एकमेकांशी बोलण्यासाठी सिग्नल अॅपचा वापर करत होते.

दिल्ली पोलिस सूत्रांनी असेही सांगितले की आरोपींचा सर्वात मोठा उद्देश मीडियामध्ये प्रसिद्ध होणे हा होता, त्यामुळे अधिवेशन काळात संसदेत प्रवेश करण्याची योजना तयार करण्यात आली होती. 13 डिसेंबर रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सुमारे 22 वर्ष होत आहेत.लोकसभेतील व्हिजिटर गॅलरीतून दोन तरुणांनी अचानक खाली उडी मारली. त्यावेळी भाजप खासदार खगेन मुर्मू लोकसभेत आपले म्हणणे मांडत होते.