अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचे वैद्यनाथाच्या परळीत भाविकांकडून उत्साहात स्वागत

🔷1 ते 15 जानेवारी दरम्यान लोकोत्सव , जनसंपर्क अभियान राबवणार

बीड/परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क- येत्या 22 जानेवारी रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या अनुषंगाने देशभरात सर्वत्र आयोध्या येथील अभिमंत्रित करण्यात आलेल्या अक्षता कलशाचे आगमन शहरा शहरात होत आहे. आयोध्येतून देऊन आलेल्या अक्षता कलशाचे आज पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाची नगरी असलेल्या परळी वैजनाथ येथे आगमन झाले.

या निमित्ताने औद्योगिक वसाहत येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आलेल्या अक्षता कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे एक ते 15 जानेवारी या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या जनसंपर्क अभियानाचे नियोजन करण्यात आले. श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना हा लोकोत्सव व्हावा व या प्रतिष्ठापनेच्या वेळी स्वागत समारंभ, विविध उपक्रम, शोभायात्रा आदी नियोजन करण्यात आले. या मेळाव्याला परळी शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक सर्व शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.