महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा अंदाजित वेळापत्रक जाहीर

अंदाजित वेळापत्रक -शासकीय सेवा 

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित
वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इतर महत्त्वाच्या परीक्षांची तारीख पुढीलप्रमाणे राहणार आहे.

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २७ मार्च २०२४, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व
न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २७ जुलै, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १६ जुन, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर, सहायक मोटार वाहन निरिक्षक मुख्य परीक्षा २६ ऑक्टोबर, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा १७ नोव्हेंबर, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा २८ एप्रिल, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा ९ नोव्हेंबर, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १० नोव्हेंबर, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परिक्षा १० नोव्हेंबर, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा परीक्षा २३ नोव्हेंबर, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २३ नोव्हेंबर, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २३ नोव्हेंबर, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा १ डिसेंबर, राज्य सेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर, महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २८ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान होईल. सदरील वेळापत्रक अंदजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना, दिनांकामध्ये कोणत्याही प्रकाराचा बदल होऊ शकतो अशी शक्यता आहे.

परीक्षा वेळापत्रकात बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग उपसचिव दे. वि. तायडे यांनी सांगितले.