आंतरराष्ट्रीय पर्यटन/ जागतिक वारसा
सांभाजीनगर /फर्दापूर : बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत.नुकतीच श्रीलंकेच्या वीस सदस्यीय संसदीय शिष्टमंडळाने रविवारी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीस भेट दिली. यावेळी लेणीतील अप्रतीम कलाकृती बघून शिष्टमंडळाचे सदस्य भारावून गेले. संध्याकाळी शिष्टमंडळ विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.
शिष्टमंडळात श्रीलंका संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना, त्यांची पत्नी सुश्री नेलुम ललना यापा अबेवर्धना, मुख्य व्हीप प्रसन्न रणतुंगा, खासदार जीवन ठोंडमन, उपसभापती अजित राजपक्षे, समितीचे उपाध्यक्ष अंगजन रामनाथन, खासदार निरोशन परेरा, वीरसुमना वीरासिंघे, मो. मुझम्मील, उदयकुमार, वरुणा प्रियंथा लियानागे, जगथ समरविक्रम, एम. रामेश्वरन, महासचिव कुशाणी अनुषा रोहनाडीरा, उपसचिव चामिंडा कुलरत्ने, सहाय्यक संचालक प्रशासन जयलथ परेरा, डॉ. चमीरा यापा अबेवर्देना, जिनलाल चुंग, उपसचिव मुकेश कुमार, एल्डोस मॅथ्यू पुन्नूज, कोलंबोमधील भारतीय
उच्चायुक्तालयातील अधिकारी यांचा समावेश होता.
या शिष्टमंडळासोबत विधानमंडळ उपसचिव उमेश शिंदे, कक्ष अधिकारी विनोद राठोड राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, सोयगाव तहसीलदार मोहनलाल
हरणे, शुभम रावळकर तसेच संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती. या संसदीय शिष्टमंडळाने लेणीच्या कलाकृतीची पाहणी करत बारकावे समजून घेतले.