धारदार शस्त्र घेऊन पाठलाग करणाऱ्या गुंडाला घाबरून एकाचा मृत्यू

थरारक –
नांदेड शहरात थरार नाट्य ; पॅरोलवर सुटलेल्या आरोपीला पोलिसानी गोळीबार करून पकडले

नांदेड : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या व  सध्या पॅरोलवर सुटलेला गुंड एका हातात तलवार व दुसऱ्या हातात खंजर घेऊन तब्बल दीड तास धुमाकूळ घालत  दहशत पसरवत असल्याची घटना शहरातील प्रसिद्ध गुरुद्वारा परिसरातील  गेट नंबर ५  येथे रविवारी (दि. १७) दुपारी घडली. मिळालेल्या माहिती नुसार सदर गुंड परिसरात
उभ्या एका व्यक्तीच्या मागे लागला. व्यक्ती पुढे तर गुंड मागे असा थरार काही काळ रंगला. आता हा गुंड आपल्यालाक काही सोडत नाही असे वाटल्याने सदर व्यक्ती अडखळून पडली. त्यात हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्याचा जागीच  मृत्यू झाला.   यानंतरही सदर आरोपी गुंड गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून आणण्याची धमकी देत असल्याने अखेर पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी  अवस्थेत ताब्यात घेतले.
याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

या धक्कादायक घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरातील गुरुद्वाराच्या गेट नंबर५ भागात जन्मठेपेची शिक्षा
भोगत असलेल्या व सध्या पॅरोलवर सुटलेल्या कुख्यात गुंड  शेरुसिंग नानकसिंग गिल हा रविवारी दुपारी एका हातात तलवार ओ एक हातात खंजीर घेऊन अनेकांना धमकावत होता. यातच शेरूसिंग  गिल हा रज्जुसिंग  गुलाब सिंग पाटी याच्या मागे लागला.  रज्जूसिंहला भितीपोटी पळताही येत नव्हते तो अडखळून पडला यातच त्याला त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच त्याचा यावेळी मृत्यू झाला.

२००६ मध्ये शेरूसिंग गिल याला  एका गुन्ह्यात शिक्षा झाली होती सध्या तो तो सध्या पॅरोलवर बाहेर होता . या वेळी त्याने पोलिसाना गॅस सिलेंडरद्वारे स्फोट घडवण्याची धमकी जीआय दिली. त्याला ताब्यात घेण्याचा शेवटचा पर्याय म्हनुन पोलिसाना गोळीबार  करून त्यास जखमी करावे लागले.

वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड स्वतः फौजफाट्यासह हजर
होते  गोळीबारात रज्जूसिंग हा जखमी झाला असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर येथील शासकीय रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पालीस अधिकारी सुरज गुरव, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची उपस्थिती होती. घटनेप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.