महिला पोलिसाला महिलेची मारहाण

🔷 अप्पर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभागाच्या कार्यालयातील घटना.

  • पुणे– पुण्यासारख्या शहरात देखिल पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावण्या च्या घटना घडत आहेत. शहरातील सेंट्रल बिल्डींग येथे पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात नेमणुकीस असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचे डोक्यात मोबाईलने मारहाण करुन धक्काबुक्की करुन धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. श्वेता प्रमोद कदम (रा. येरवडा, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात पोलीस हवालदार राखी योगेश खवले यांनी आरोपी महिले विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार राखी खवले या पूर्व प्रादेशिक विभाग येथे अपर पोलिस आयुक्त कार्यालयात नेमणुकीस आहे. आरोपी महिला श्वेता कदम या महिलेच्या तक्रारी अर्जाचे अनुषंगाने अपर पोलिस आयुक्त हे सहाय्यक पोलिस आयुक्त खडकी यांनी पाठविलेला अहवाल पाहून, अर्जदार नमुद अारोपी महिलेस सांगत असताना, सदर आरोपी महिलेने संबंधित अहवाल तिच्या मनाप्रमाणे नसल्याचे कारणावरुन सदर ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परंतु त्यानंतर देखील महिलेने आरडाओरडा करत तिच्या हातातील मोबाईलने तक्रारदार पोलिस हवालदार राखी खवले यांच्या डोक्यात मारहाण करुन धक्काबुक्की करुन पाहुन घेण्याची धमकी दिली. याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.