अडीच हजार फ्रॉड लोन ॲप गुगलने केले  बंद

मुंबई : लोकांना गंडा घालण्यासाठी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरची वापर करत आसरा घेतला होता. प्ले स्टोअर वरील ॲप द्वारे कर्ज देण्याचे बहाणे करत संपर्क करणारे हजारो संकेत स्थळे आणि ॲप  होते. असे ॲप एक-दोन नव्हे, तर सुमारे अडीच हजार फ्रॉड लोन ॲप गुगलने बंद केले आहेत.

कर्ज देण्याच्या बहाण्याने लुबाडण्यासाठी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी गुगल प्ले स्टोअरवर ॲपची नोंदणी केली होती. गुगल प्ले स्टोअर असल्याने अनेकजण त्यावर विश्वास ठेवत असत. व ते ॲप डाउनलोड करत. यात अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहिती नुसार एप्रिल २०२१ ते जुलै २०२२ या काला वधीत गुगल कडून असे सुमारे अडीच हजार ॲप प्ले स्टोअर वरुण काढून टाकण्यात आले आहेत. Financial satiability & development conical   समोर हा प्रश्न चर्चिला जाणार असून त्याच्या अध्यक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामन या आहेत. फसव्या ॲपला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नोंदणीकृत संस्थांची नावे जाहीर केली आहेत. ही सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला सादर करण्यात आली आहे.

फ्रॉडच्या सर्वाधिक घटना घडलेल्या गुगलला देखील ही गुगलनेदेखील प्ले स्टोअरवर ॲप घेण्यापूर्वीची प्रक्रिया अधिक कडक केली आहे.त्यानुसार नियामक संस्थांनी नोंदणीकृत केलेल्या संस्थांनाच यापुढे प्ले स्टोअरवर स्थान दिले जाणार आहे.