सौ.शितल सोनवणे – उगले यांच्या चित्रं प्रदर्शनास मोठा प्रतिसाद

🔷 कलाविष्कार:

🔷 कला /कलावंत-चित्रप्रदर्शन-

नाशिक/ एम एन सी न्यूज नेटवर्क :  येथील सौ. शितल सोनवणे – उगले  यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन बी.वाय.के. महाविद्यालयाच्या गुरूदक्षिणा कला दालनात,   आयोजीत करण्यात आले होते. त्यास कला रसिकांचा-प्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.

शहरातील बी.वाय.के. महाविद्यालयाच्या गुरूदक्षिणा कला दालनातील या नवोदित चित्रकर्तीच्या  चित्रप्रदर्शनास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. दरम्यान  अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्थेचे सचिव श्री. भालचंद्र साळी, कायदेविषयक सल्लागार ॲड. बाळकृष्ण ढोमणराव मोरे तसेच मा. शिक्षणाधिकारी श्री. अनिल शहारे, इमेज ट्राॅफिज्, नाशिक चे संचालक श्री समीर मांजरेकर,नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळाचे श्री. मनिष शेकटकर, श्री.जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष श्री.पवन साळी आणि ॲड.श्रीरंग मोरे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सर्वांनी सौ. शितलच्या चित्रशैलीचें कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.