परळी तालुक्यात मतदार जनजागृती

🔷 मतदार जनजागृती

बीड/ परळी वैजनाथ/ एमएन सी न्यूज नेटवर्क:– परळी तालुक्यात मतदान जनजागृती अभियान परळी तहसील कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा पूर्व तयारीचा भाग म्हणुन भारत निवडणूक आयोगाने 233 परळी विधानसभा मतदार संघात EVM/ VVPAT मशिनचे प्रशिक्षण, प्रसार, य प्रसिध्दी तसेच जनजागृती करण्याचे निर्देश दि. 15 डिसेंबर 2023 ते दि. 29 फेब्रवारी 2023 या कालवधीत राबविण्या बाबत आदेशीत केले आहे.

परळी विधानसभा मतदार संघात एकुण 340 मतदान केंद्र प्रस्तावीत आहेत. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर EVM/ VVPAT मशिनचे प्रात्यक्षीक मतदारांना उक्त कालावधीत राबवीण्यात येत आहे. त्यानुसार 340 मतदान केंद्रावर प्रात्यक्षीत दाखविण्याबाबत आय टी आय परळी (मास्टर ट्रेनर) तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी व व्हीडीओ ग्राफर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दि. 23 डिसेंबर 2023 रोजी परळी विधासभा मतदार संघातील कन्हेरवाडी, इंदपवाडी, जिरेवाडी व टोकबाडी या ग्रामपंचायत ठिकाणी सदरची मोहीम राबवीण्यात आली. उक्त मोहीमे साठी मतदाराने मतदान प्रक्रिया बाबतची माहिती देण्यात येत आहे. मतदार संघातील परळी येथील 240 मतदान केंद्र व अंबाजोगाई येथील 100 केंद्रावर EVM/VVPAT मशिनचे मतदारांना प्रशिक्षण येणा-या कालावधीत देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये मतदान प्रक्रिया, मतदान विषयक बाबी बाबत मतदारांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी मतदारांना EVM/ VVPAT मशिनचे कोणत्याही अडचणी
निर्माण होणार नाहीत.

या वेळी परळीचे तहसीलदार वेंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बी.एल.रुपनर, पुजारी , सोलवंडे, (आय टी आय मास्टर ट्रेनर ), तलाठी विष्णू गिते , फड सर मु अ जि प शाळा, सरपंच गोवर्धन कांदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.