🔸खाद्यपदार्थ/खाद्यसंस्कृती/परंपरा:
🔸निपाणी– मुंबई-
🔷 उत्कृष्ट चवीची अखंड परंपरा, परिपूर्ण स्वच्छता, आणि सस्मित सेवा
निपाणी/एम एन सी न्यूज नेटवर्क – एखाद्या व्यवसायात सातत्य आणि ग्राहकाभिमुख सस्मित सेवा असेल तर तो व्यवसाय निश्चितच वाढतो.निपाणी येथील सागावकर परिवाराने हॉटेल व्यवसायाला परंपरा, चवीची खासियत बहाल करत सस्मित सेवा देत वेगळ वलय निर्माण केले. निपाणी येथील मुख्य बस स्टँड समोर सागावकर बंधू यांचे हॉटेल आराम ला आज अनेकांनी सदिच्छा भेट दिली.सन १९४८ वर्षी स्थापन झालेल्या या हॉटेल ला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.हॉटेल आराम आणि हॉटेल वैभव या दोन्ही हॉटेल
व्यवसाय मध्ये आता सागावकर परिवाराची चौथी पिढी हा व्यवसाय पाहत आहे.निपाणी येथे ७ हॉटेल व मुबई येथे ही हॉटेल आराम ची शाखा आहे .
या सदिच्छा भेटी प्रसंगी साळी समाजातील कराड येथील थ्री स्टार हॉटेल अलंकार चे प्रौप्रायटर श्री दिपकशेठ आरबूने, हॉटेल पार्थ कोल्हापूर चे श्री राजू चिल्लाळ, एस बी सी संघर्ष समितीचे राज्य समनवयक आणि इस्लामपूर साळी समाज सचिव श्री दिलीप पोरे, कोल्हापूर येथील श्री धोंडीराम पागडे, नगरसेवक, श्री संतोष सागावकर आणि श्री जय सागावकर उपस्थित होते.