🔷 सहकार

तेलंगणा/ हैद्राबाद-विना संस्कार, नहीं सहकार..विना सहकार, नहीं उध्दार..हे ब्रीद वाक्य घेऊन संपूर्ण देशात सहकार क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर स्वयंसेवी संघटना म्हणून सहकार भारती कार्य करत असते या सहकारी भारती संघटनेच्या वतीने हैद्राबाद- तेलंगणा येथे तृतीय राष्ट्रीय महिला अधिवेशन आयोजित गेले होते. या अधिवेशनाची सुरुवात सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री उदयजी जोशी, राष्ट्रीय संघटक संजयजी पाचापोर, राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती ताई शेंदूर्निकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

या अधिवेशन मध्ये सहकार क्षेत्रातील विविध तज्ञांकडून महिला सशक्तीकरण तसेच सहकार क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग या विषयावर मार्गदर्शन झाले. या अधिवेशनात देशातील विविध राज्यातील तीन हजार पेक्षा जास्त महिला सदस्यांनी सहभाग घेतला होता.

या अधिवेशन साठी सहकारी क्षेत्रातील महिला सहभागी झाल्याहोत्या