सोमवारी तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथें भक्तांची प्रचंड गर्दी

शेजारील राज्यातील भाविकांचे लक्षणीय उपस्थिती

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिरात शनिवार आणि रविवार रोजी आलेल्या सुट्टी आणि सोमवारी नाताळच्या सुट्टी चा आनंद भाविकांनी सकाळ पासून रांगा लावून दर्शन घेतले.वर्षा अखेरीस सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे रविवारी आणि सोमवारी परळी शहरातील ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकाची प्रचंड गर्दी होती.

शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातील भाविक भक्तांसह राज्याच्या अनेक भागातून रेल्वे सेवेने आलेली तसेच चार चाकी वाहने, खाजगी आराम गाड्या त्यांची मोठी गर्दी परळीतील विविध भागात आज दिसून आली. शेजारील राज्यातील अनेक भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.

देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हजारो भाविकांनी आज सोमवारचे औचित्य साधून ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले दर्शनानंतर अनेक भक्तांनी प्रतिक्रिया देताना ज्योतिर्लिंग चे दर्शन घेऊन अतिशय समाधान झालं अशा भावना ही व्यक्त केल्या.