कोरोना! आरोग्य विभागा सतर्क ,देशभरात २४ तासांत कोरोनाचे ११८ नवीन रुग्ण

कोरोना संक्रमण-जेएन-१ 
नवी दिल्ली : भारतात कोरोना संक्रमणाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. देशात २४ तासांत कोरोनाचे ११८ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह सक्रिय प्रकरणांची संख्या ४१७० झाली आहे.भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. देशात २४ तासांत कोरोनाचे एकूण ४१२ नवीन रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत २९३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मृत्युंची नोंद कर्नाटकात झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे ४१७० सक्रिय रुग्ण आहेत. इतर राज्यात केरळमध्ये मंगळवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही येथे ३२  रुग्ण बरे झाले असून  येथील सक्रिय रुग्णांची संख्या ३०९६ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १६८ सक्रिय रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये ही संख्या १३९ आहे. तर कर्नाटकात ४३६ सक्रिय प्रकरणे आहेत. सर्वाधिक सक्रिय प्रकरणे फक्त केरळमध्ये आहेत.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत भारतात जेएन-१ च्या नवीन उप-प्रकारातील एकूण ११६ नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. तर गोव्यातही चिंताजनक स्थिती आहे. येथे सक्रिय कोविड बाधितांची संख्या वाढून ३७ झाली आहे. गोव्यात नाताळ आणि नववर्ष आणि सनबर्नच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने पर्यटक एकत्र येतील तेव्हा ही संख्या अजून वाढू शकते