12 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असुन 24 लाख रुपये मंजूर.
बीड /परळी वैजनाथ एन एन सी न्यूज नेटवर्क – शेती करताना शेतकऱ्याच्या किंवा ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात अनेक अडचणीचे आणि अपघाताचे प्रसंग उद्भवतात अशा अपघातात अनेक शेतकरी किंवा कामगारांचा मृत्यू होतो, किंवा काहींना अपंगत्व येते. आपला जिल्हा ऊसतोड कामगारांचा म्हणून अधिक ओळखला जातो. ही ओळख पुसण्यासाठीही आपण काही अधिकचे प्रयत्न केलेले नाहीतच.घरातील प्रमुख माणूस गेल्यामुळे तसेच अपंगत्वामुळे कुटुंबीयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अशा आणीबाणीच्या प्रसंगी शेतकरी कुटुंबीयांना मदत व्हावी यासाठी शासनाने गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. परळी तालुक्यातील 18 पैकी 12 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असुन 24 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी परळी तालुक्यातुन तब्बल 18 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. परळी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी तहसील कार्यालय येथे तालुकास्तरीय समिती समक्ष झालेल्या बैठकीत 10 पैकी 8 प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. दोन प्रस्तावात त्रुटी निघाल्या होत्या. त्यानंतर 18 डिसेंबर 2023 रोजी चार प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. असे एकूण बारा प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे आहेत.
घरातील प्रमुख व्यक्ती अपघातात मृत्यू पावल्याने कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. घरातला करता पुरुष किंवा महिला गेल्यामुळे कुटुंबाची वाताहात होते,कुटुंबीयांना करावा लागतो. शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
एक ते दोन लाख रुपयापर्यंत चा लाभ- शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये व अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते.
……………………………………………
परळी तालुक्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 18 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील 12 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत तर उर्वरित 6 प्रस्तावात त्रुटी असल्याने ते मंजूर करण्यात आलेले नाहीत.
अमोल यादव
(कृषी पर्यवेक्षक परळी वै)
………………………………………….
गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. परंतु अद्याप खात्यात दमडीही पडली नाही.शासनाने लवकरात लवकर खात्यात पैसे जमा करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा.
अमर देविदास सोळंके
नागापूर ता. परळी वै
अमर देविदास सोळंके
नागापूर ता. परळी वै
………………………………………….
या योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थीं
अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव अर्जदाराचे नाव
1)सत्यप्रेम केदारनाथ काकडे गीता सत्यप्रेम काकडे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
2)उमाकांत कुंडलिकराव कांदे लक्ष्मी उमाकांत कांदे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
3)केशव वामन गुट्टे हरीबाई केशव गुट्टे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
4)मुंजाजी किशन होळंबे संगीता मुंजाजी होळंबे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
5)शंकर रामराव केंद्रे उमा शंकर केंद्रे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
6)सुभाष अंगद दहिफळे ज्योतीबाई सुभाष दहिफळे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
7)व्यंकटेश मुक्ताराम मुंडे राणी वेंकटेश मुंडे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
8)संभाजी गणपती सातभाई सुलोचना संभाजी सातभाई( मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
9)दत्ता रुस्तुम रासवे अश्विनी दत्ता रासवे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये
10) देविदास सोळंके सुमन देविदास सोळंके (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
11)अरुण मारुती माने मीना अरुण माने (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)
12)काशिनाथ निवृत्ती होळंबे राजमाला काशिनाथ होळंबे (मंजुर रक्कम -2 लाख रुपये)