“ये तेरा घर.. ये मेरा घर ..!

आठवण – आज पुण्यतिथी

🔷“ये तेरा घर ये मेरा घर…, तुमको देखा तो ये खयाल आया…फारुख शेख

फारूक शेख म्हणजे अनेक प्रेक्षकाना आपल्याच भावना मंडणारा नायक वाटायचा ‘आजा रे आजा रे ओ मेरे दिलबर’, ‘दिखाई दिए यूं..’, ‘फिर छिड़ी बात…, तूमको देखा तो ये खयाल आया….’,  ‘चोरी चोरी कोई आए… ही गाणी ऐकली नाहीत, अशी व्यक्ती दुर्मीळच. ही सर्व गाणी फारुख शेख यांच्या चित्रपटातील आहेत.

तुम्हा आम्हा सारखाच दिसणार अतिशय साधा,सरळ आणि सहज स्वभावाचा माणूस, मध्यमवर्गीय जनमाणसांची कहाणी,त्यांची स्वप्ने-भावना पडद्यावर सजग करणार असा अभिनेता ज्यांच्या निधनाला  आज तब्बल दहा वर्षे पूर्ण झालीत. त्यांचे दि २८ डिसेंबर २०१३ रोजी अचानक निधन झाले.

२५ मार्च १९४८ रोजी त्यांचा जन्म मुंबईत वकील मुस्तफा शेख यांच्या घरी गुजरातच्या अमरोलीमध्ये झाला. त्यांचे कुटुंबीय जमीनदार होते आणि त्यांचे पालनपोषण परिवेशमध्ये झाले. मुंबईच्या सेंट मेरी स्कूल आणि सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ मधून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही दिवस वकिलीदेखील केली; परंतु अभिनयात आवड असल्याने ते अभिनेते बनले, फारुख शेख  यांनी त्यांच्या चित्रपट कारकीर्द मध्ये  सत्यजित रे आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यासारखे दिग्गज कलाकार आणि अनेक दमदार अभिनेत्यांसोबत काम केले आहे. दीप्ती नवल यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. भलेही आज फारुख शेख या जगात नाहीत; परंतु त्यांनी साकारलेल्या भूमिका, चित्रपट, गाणी लोक विसरले नाहीत. त्यांनी टीव्हीवर काम केले. एक चांगले कलाकार असण्यासोबतच ते सरळ-साधे व्यक्तीदेखील होते. त्यांचा पहिला चित्रपट ‘गरम हवा’ (१९७३) साठी त्यांना ७५० रुपयांची फी मिळाली होती. त्यांचे मुख्य चित्रपट ‘बाज़ार’, ‘नूरी’, ‘उमराव जान’, ‘साथ साथ’, ‘चश्मे बदूर’, ‘फासले’, “बीवी हो तो ऐसी’, ‘गमन’, ‘गुंजन’ हे आहेत.”