बालनाट्य स्पर्धेत ‘एलियन्स द ग्रेट’ नाटकाला पहिले पारितोषिक

दोन वैयक्तिक बक्षिसे, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून महेश होनमाने यांचा सन्मान 
बीड/परळी वैजनाथ -एमएनसी न्यूज नेटवर्क :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गटस्तरीय बालनाट्य स्पर्धेत परळी येथील ‘एलियन्स द ग्रेट’ नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
 कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लातूर येथे कामगार कल्याण भावनात बुधवारी (दि. २७ डिसेंबर-२३) बालनाट्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ८ नाट्यप्रयोग सादर झाले. त्यात महेश होनमाने दिग्दर्शित ‘एलियन्स द ग्रेट’ नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. तर द्वितीय बे एक बे, तृतीय स्वच्छता या नाटकाला बक्षीसे मिळाली. एलियन्स द ग्रेट नाटकाच्या दिग्दर्शनासाठी महेश होनमाने यांचा प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले. तर विठ्ठल या भूमिकेसाठी राजवीर शिंदे यांना द्वितीय बक्षीस मिळाले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय नाट्य परिषदेचे लातूर शाखा अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, नाट्यकर्मी डॉ. मुकुंद भिसे, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, गुणवंत कामगार सुधीर मुंडे, संयोजक सलीम पठाण यांच्या हस्ते झाले. या बालनाटिकेत आयुष पिसे, आदिनाथ यादव, प्रतीक मुंडे, श्रुतिका सुरवसे, अक्षरा धर्माधिकारी, ओमसाई कापावार, श्रीकृष्ण भिसे, विक्रम सरवदे, शर्वरी कापावार, श्रीयांश सुळ, राजवीर शिंदे यांनी भूमिका केली. तर सहदिग्दर्शक शिरीष तीर्थकर, नेपथ्य दिनेश कदम, प्रकाश योजना गायत्री सिद्धेश्वर, संगीत सोनाली डोंगरे, रंगभूषा रोहिणी होनमाने, रंगमंच व्यवस्था प्रशांत पांडे, वेशभूषा संतोष कापावार यांनी केले.