सीए महेश धर्माधिकारी यांचे निधन

दुःखद निधन

कोल्हापूर/- येथील श्री महालक्ष्मी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक ,
सहकार भारती कोल्हापूर जिल्हा माजी अध्यक्ष ,
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन विद्यमान उपाध्यक्ष, संचालक कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, विश्वस्त सावली केअर सेंटर कोल्हापूर,
माजी संचालक दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबई तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच सहकारी बँकांचे मार्गदर्शक , सहकार अभ्यासक,
चार्टर्ड अकाउंटंट श्री.महेश मल्लारी धर्माधिकारी (वय ६६) यांचे आज गुरुवार २८ डिसेंबर रोजी सकाळी येथील एका हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.

त्यांच्यावर शनिवारी ओपन हार्ट सर्जरी झालेली होती, तथापि सर्जरीनंतर काही कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे ते आयु सी यू मध्येच होते,  डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. परंतु आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी मुली जावई नात -नातू तसेच गणेश सहकारी बँक कुरुंदवाड चे संचालक व सीए मुलगा मंदार व कोल्हापूर महिला सहकारी बँकेच्या संचालिका सौ पूजा मंदार धर्माधिकारी आहेत.