न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत १५ जानेवारी पर्यन्त अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २९ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्यामार्फत न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात विविध उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यानी १५ जानेवारी २०२४ पर्यत अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमुंबई यांनी केले आहे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणे (२५ हजार व ५० हजार रुपये करिता स्वतंत्र योजना) (गट-अ) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा जातीचा दाखलाशिधापत्रिकादारीद्र्य रेषेखालील कार्ड किंवा चालुवर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रुपये २.५० लाख पर्यंत मर्यादा)आधार कार्डबँकेचे पासबुक पहिले पान व फोटोजो व्यवसाय करणार त्याचे खर्चाचे अंदाजपत्रक इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.  अनुसूचित जमातीच्या घरामध्ये २.५ विद्युत संच बसविणे (गट – क) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचा जातीचा दाखलाशिधापत्रिकादारीद्रय रेषेखालील कार्ड किंवा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (रुपये २.५० लाख पर्यंत मर्यादा)आधार कार्डबँकेचे पासबूक पहिले पान व फोटो इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

या योजनेसाठी अर्जाचा नमुना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई,कस्तुरबा क्रॉस रोड न. २कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉलतळमजलाबोरिवली पूर्वमुंबई या कार्यालयामार्फत विनामूल्य उपलब्ध करुन दिला जाईल.

(जीमाका)