CISF च्या पहिल्या महिला प्रमुखपदीःनीना सिंह

◾ सर्व विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी

नवी दिल्ली –  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदाची जबाबदारी देशात पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली असून 1989 बॅचच्या राजस्थान केडर च्या आयपीएस अधिकारी नीना सिंग यांना ही जबाबदारी मिळाली आहे. सर्व विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि देशभरातील इतर शासकीय इमारतींच्या सुरक्षेचा अंतर्भाव आहे.

नीना सिंह वर्ष 2013 ते 2018 दरम्यान सीबीआयच्या सहसंचालक होत्या. या काळात त्यांनी अनेक हायप्रोफाइल केसेसवर काम केले. 2020 मध्ये त्यांना अतिउत्कृष्ट सेवा पदकदेखील प्रदान करण्यात आले.

नीना सिंह यांनी 2005-2006 मध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी पोलिस स्टेशन्स लोकांसाठी अधिक सुलभ बनविण्याच्या प्रकल्पावर काम केलेआहे.