🔷 जलद आणि आरामदाई प्रवास -३० डिसेंबरपासून या सेवेस सुरुवात.
🔷 जालना -मुंबई , ◾ गोवा -मंगळूर वंदे भारत एक्सप्रेस चा उद्या शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर – गोवा -मंगळूरसह अन्य ५ मार्गांवर वंदे भारत आणि २ अमृत भारत रेल्वेंचे उद्घाटन ३० रोजी केले जाणार आहे. तर मराठवाड्यात साठी महत्वाची गोष्ट असणारी जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे.
गोव्यात याचवर्षी जून महिन्यात मडगाव ते मुंबई मार्गावर धावणारी पहिली वंदे भारत गाडी सुरू करण्यात आलेली होती. आता कोकण रेल्वे मार्गावर धावणारी गोव्यासाठी दुसरी मडगाव जंक्शन ते मंगळूर या मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत गाडी धावणार आहे. मंगळुरु- मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरु सेंट्रल येथून सकाळी साडेआठ वाजता सुटेल व दुपारी १.१५ वाजता मडगाव जंक्शनवर येईल. तर मडगाव येथून दुपारी १.४५ वाजता सुटणारी वंदे भारत सायंकाळी साडेसहा वाजता मंगळुरूला पोहोचेल. ही गाडी उडुपी व कारवार या स्थानकांवर थांबेल, असे सांगण्यात आलेले आहे.मंगळूर येथून सुटणार्या व गोव्यातील दुसर्या वंदे भारत रेल्वेचे स्वागतासाठी मुख्यमंत्री सावंत, आमदार दिगंबर कामत यासह इतर मान्यवर मडगाव स्थानकावर उपस्थित राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
🔷जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस- प्रारंभी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे राहतील. ही एक्सप्रेस गाडी शनिवारी (३० डिसेंबर) सकाळी ११ वाजता जालना येथून निघेल. सकाळी ११.५५ वा. छत्रपती संभाजीनगर, मनमाड १३.४२, वा, नाशिक रोड १४.४४ वा., कल्याण १७.०६, वा., ठाणे १७.२८, दादर १७.५०वा. तर मुंबई १८.४५ वाजता पोहोचेल.
……………………………………………
🔷 .. ६ वंदे एक्सप्रेस २ अमृत भारत एक्सप्रेस ..
पंतप्रधान मोदी यांच्याकडून ३० रोजी🔸 श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस,🔸 अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस,🔸 कोईम्बतूर-बंगलोर कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस,🔸 मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, 🔸 जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि 🔸 अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस या वंदे भारतसह 🔸दरभंगा-अयोध्या-आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस व 🔸मालदा टाउन-सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस (बेंगळुरू) अमृत भारत एक्सप्रेस या दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. जालना-मुंबई , मंगळूर- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सेवेच्या प्रारंभामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, ज्यामुळे या दोन्ही प्रदेशातील प्रवासाचा वेळ कमी होऊन पर्यटन आणि व्यवसायाच्या संधींना चालना मिळणार आहे.