दुःखद निधन
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – येथील जुन्या गावभागातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व व नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी यांचे आज दि. 28 रोजी वृद्धपकाळाने निधन झाले .मृत्यू समयी ते 86 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी हे सरकारवाडा अंबेवेस भागातील सर्व परिचित व्यक्तिमत्व होते.नगर परिषद परळी वैजनाथ चे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. दीनदयाळ बँकेचे परळी वैजनाथ शाखाव्यवस्थापक मुरलीधर धर्माधिकारी, बँक कर्मचारी अनिल धर्माधिकारी यांचे ते वडील होत. वृद्धापकाळाने आज दि. 28 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
◾उद्या अंत्यविधी- दरम्यान, रामचंद्र पंडितराव धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार, दि.30.12. 2023 रोजी सकाळी 10:00 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राहते घर गोपनपाळे गल्ली, आंबेवेस परळी वैजनाथ येथुन अंत्ययात्रा निघेल.