जालना- शहरातील नवीन मंडई जवळ दुचाकी वरून आलेल्या दोन चोरट्याने व्यापाऱ्याजवळील सहा लाखाची बॅग हिसकाटून पोबरा केला. ही घटना 29 डिसेंबर रोजी श्रीराम टाइल्स आणि स्टोन जवळ शुक्रवारी सकाळी ११.३० ते १२ च्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जालना शहरातील व्यापारी जय अभय छाजेड यांचे नवीन मोंढा भागात होलसेल किराणा दुकान असून शुक्रवारी सकाळी ते दुकानात काम करणारा मुलगा याच्या सह दाना बाजार येथून नवीन मंडई कडे आपल्या दुकानात जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी जवळील बॅग मध्ये सहा लाख रुपये ठेवून ती बॅग स्कुटीच्या समोरील भागात ठेवली होती. शहरातील नवीन मोंढाजवळ गेल्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या जवळील बॅग हिसकाऊंन पळविली. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, संग्रामसिंग राजपूत यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर स्थळावरील सीसीटीव्ही चे फुटेजही चेक केले. यात तिघेजन दुचाकी वरून येताना दिसतात. याप्रकरणी किराणा व्यापारी जय अभय छाजेड (१९)राहणार दाणा बाजार, जालना यांच्या फिर्यादीवरून चंदन झिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.