मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करण्याऐवजी संभाजीनगर पोलिसांची टाळाटाळ

परळीतील पोलिस ठाणे अनाधिकृत व्यक्तींच्या इशार्यावर-बहादुरभाई

बीड /परळी वैजनाथ एमएनसी न्यूज नेटवर्क- परळी शहरातील तिन्ही पोलिस ठाणे अनाधिकृत व्यक्तींच्या इशार्यावर चालत असुन सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारी घेण्यासाठी अनेक तास चौकशी करणारे परळी पोलिस आपल्या मर्जीतील आरोपींना वाचवण्यासाठी कायदा पायदळी तुडवत साक्षीदारांना फोडण्यासाठी मदत करत आहेत.न्यायालयाची भुमिकाच परळी पोलिस निभावत असल्याने पोलिसांचा हा कारभार बंद झाला नाही तर कॉंग्रेसच्या वतिने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई यांनी यांनी दिला आहे.

परळी पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई यांनी नेहरु चौक येथील शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की,परळी शहरातील बरकतनगर भागात बुद्रोदीन शेख यांना दि.18 नोव्हेंबर 2023 रोजी बरकतनगर भागात आरोपी जब्बार,फिरोझ,आणि अमजद यांनी जबर मारहाण करुन जखमी करत खिशातील 40 हजार रु.लॉकर व स्कुटीची चावी चोरल्याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेतील आरोपींनी अटकपूर्व जमानतीसाठी अर्ज दिला असता तिघांपैकी जब्बार याना जमीन मंजूर झाला तर इतर दोघांना न्यायालयाने अद्याप जमानत अर्ज मंजूर केलेला नाही.आरोपींना अटक न करण्याचा संभाजीनगर पोलिसांचा मनोदय असुन जामीन घेण्यास,साक्षीदार फोडण्यासाठी आरोपींना पुर्ण सुट देण्यात येत असल्याचे अनेक प्रकरणं मध्ये परळीकर.याना अनुभव आहे याच पार्शवभुमीवर आरोपी अमजदचे नाव कमी करण्याचे हेतूने पोलिस स्वतः आरोपीस अटक न करता त्यांनी त्याला आरोपातून निर्दोष काढण्यासाठी मार्गदर्शन करीत असल्याचे दिसत आहेत कारण काल दि.28 डिसेंबर रोजी दुपारी स्वतः आरोपी लाल गाडीत त्याबरोबर दोन जण साक्षीदार मणियार याना पोलिस स्टेशन परळी येथे आणून त्यांचा तपास अधिकारी न्यायालयात घेवून जाऊन 0169 खाली न्यायालयासमोर स्टेटमेंट घेतात आणि आरोपी अमजद यांचे नाव जवाब मध्ये घेऊ नये म्हणून आरोपी अमजद ,बाबा टेलर यांनी दबाव खाली उत्तर घेतलं.

एवढेच नव्हे तर कुठल्याही प्रकरणात परळी पोलिसांची संशयास्पद भुमिका दिसत असुन सामान्य नागरीक फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्यानंतर वरुन निरोप आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नाही.परळीचे तिन्ही पोलिस ठाणे नावालाच सरकारी उरले असुन परळी पोलिसांवर अनाधिकृत व्यक्तींची निरंकुश सत्ता असल्याचा आरोप कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई यांनी केला.या पत्रकार परिषदेस सय्यद हनिफ उर्फ बहादुर भाई अँड शशिशेखर चौधरी,अँड प्रकाश मुंडे,एहतेशाम खतीब, सुभाषराव देशमुख ,रसूल खान, सय्यद जावेद शेख बबलु, फरकुंद अली बेग ,शेख आलताफ ,रंजीत देशमुख अदि नेते,पदाधिकारी उपस्थित होते.