नव वर्ष काळजी घेणे महत्वाचे
मुंबई-सर्वत्र नववर्षाच्या सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू आहे. राज्या तील जवळपास सर्वच महानगरे आणि लहान मोठ्या शहरांमध्ये वाहतूक पोलिसही पूर्ण नियोजनात व्यस्त आहेत.पोलिस संध्याकाळी रस्त्यावर मद्यपान करून वाहन चालविण्यावर कडक नजर ठेवतील.आपण नवीन वर्ष साजरे करतो, पार्टी करतो, आनंद सामायिक करतो, परंतु तो जबाबदारीने करावा जेणेकरून आपल्या आनंदाला कोणत्याही अपघाताने ग्रहण लागू नये.याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
दारू पिणे आणि वाहन चालवणे
नववर्षातील १ तारखेस येणाऱ्या बातम्यात बहुतांश अपघात हे दारू पिऊन गाडी चालवण्याशी संबंधित असल्याने सर्वप्रथम आपण त्यासंबंधीच्या खबरदारी घ्या. प्रथम नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणत्या गोष्टी टाळा 1. मद्यधुंद होऊन वाहन चालवणे,शरीर कारच्या खिडकीतून बाहेर काढणे. ओव्हरस्पीडिंग मर्यादपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे. चुकीच्या दिशेने गाडी चालवणे. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणे, ड्रायव्हिंगशी संबंधित या वाईट सवयी अपघाताचे कारण बनू शकतात
नवीन वर्षाच्या जल्लोष पार्टीदरम्यान सुरक्षित राहा
1. संतुलित प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करा. इतके मद्यपान करू नये की स्वतःची शुद्ध राहणार नाही .नवीन वर्षाची पूर्वसंध्या रविवारी आहे. क्लब किंवा पबमध्ये पार्टी करताना अनोळखी व्यक्तींनी दिलेली पेय घेऊ नका.तुम्ही ड्रिंकची योजना आखत असाल तर गाडी चालवू नका. आपल्या ओळखीच्या आणि मित्रांसोबत पार्टी करा. तुम्ही कुठे जाणार ,कुठे पार्टी करत आहात हे तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी माहीत असावे.