नववर्षाच्या पूर्वसंध्यावर ठाण्यात पोलिसांची मोठी कारवाई

🔷 धाड टाकून 100 जणांना घेतले ताब्यात, अमली पदार्थाचा मोठा साठाही जप्त

मुंबई – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे आयोजन करण्यात आले असून मुंबई महानगर आणि शेजारील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि इतर अनेक सोई सुविधा पुरवणाऱ्या रेव पार्टीचे आयोजन होत असल्याचे निदर्शनास येत असून नुकतीच ठाण्यात रेव्ह पार्टीत कारवाई करत ठाणे पोलिसांनी धाड टाकून 100 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच पार्टीत गांजा, चरस ही अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.

घोडबंदर येथील कासारवडवली भागात रेव्ह पार्टी आयोजित केली जाणार असल्याची गुप्त माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्यरात्री युनिट पाचचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी त्यांनी सुमारे 100 तरुणांना ताब्यात घेतले तर एमडी, चरस, गांजासह अमली पदार्थ जप्त केले. नववर्षाच्या स्वागता निमित्त आयोजित पार्टीत मोठ्या अमली पदार्थांचा वापर करत प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.