कृषिमंत्र्यांचा ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथास रुद्राभिषेक 

कृषिमंत्र्यांचा रुद्राभिषेक 

बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क -राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पहाटे नवीन वर्षाची सुरुवात द्वादश पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या चरणी विधिवत रुद्राभिषेक करून दर्शनाने केली.

2024 हे नवीन वर्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारे ठरावे, कृषकांची सेवा करण्याचे आपल्याला बळ मिळावे, अशी प्रार्थना यावेळी धनंजय मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी केली. यावेळी पुणे येथील उद्योजक राज घनवट हेही उपस्थित होते.