परळी तालुक्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र

◾ग्रामीण सह शहरी भागातही पाणीटंचाईच्या झळा जाणवू शकतात.
◾ काही लघु प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी शून्यावर

बीड / परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क  –  गेल्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे परळी तालुक्यात जल संकट दिसून येत आहे.अनेक लघु आणि साठवण तलावांची आजची स्थिती चिंताजनक आहे. परळी तालुक्यातील मुख्य जलशोत्र म्हणून नागापूर येथील वाण धरण अतिशय महत्त्वाचे आहे. चोरून पाणी उपसा करत आहेत त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. जेव्हा पाणी प्रश्न उद्भवतो, दुष्काळी जल संकटाची स्थिती निर्माण होते त्याप्रसंगी प्रशासनाने अशी कारवाई केली आहे. परंतु आता राखीव पाणी लपवून चोरून उपसा होऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे .
शहर आणितालुक्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाईचे सावट लक्षात घेता तालुक्यातील नागरिक आणि पशुधनासाठी येणाऱ्या काळात पाणीसाठा काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.

डिसेंबर आता समाप्त होत असतानाच वाण प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणी साठा सुमारें ६७% आहे. तालुक्यातील ईतर लघु आणि मध्यम साठवण तलाव फेब्रुवारी अखेरीस कोरडे पडू शकतात. त्यामुळे परळी शहरासह एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पुढील पावसाळा येईपर्यंत सुमारे सात महिन्याचा कालावधी आहे , या सात महिन्यात उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून पशु आणि नागरिक यांची गैरसोय टाळायची आहे. तालुक्यातील नागरिकांनी सध्या उपलब्ध असलेले पाणी नियोजन करून वापरावे अशी ही काही जेष्ठ मंडळींची मानसिकता आहे.

परळी तालुक्यातील अनेक मध्यम व लघु मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा शून्यावर येऊन ठेपला आहे.येणाऱ्या काळात पशुधनाच्या चारा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावण्याची शक्यता आहे.कार्यकारी अभियंता माजलगाव पाटबंधारे विभाग परळी वैजनाथ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील प्रकल्पनिहाय उपयुक्त पाणीसाठा दिनांक 28 डिसेंबर 2024 तारखेला परळी तालुक्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प आणि त्यातील उपयुक्त पाणीसाठा खालील प्रमाणे आहे.

◾तालुक्यातील विविध 10 लघु प्रकल्पात केवळ 2.306 दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी केवळ 6.61% एवढी अत्यल्प आहे.

लघु मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा टक्केवारीत

प्रकल्पाच नाव    उपयुक्त पाणीसाठा दलघमी   उपयुक्त टक्के
1) चांदापुर        2.763 दलघमी                  00%
2) कन्हेरवाडी     3.054 दलघमी                  00%
3) गुट्टेवाडी        1.698 दलघमी                  2.94%
4) खो. सावरगाव  0.701 दलघमी                  00%
5) कातकरवाडी   1.294 दलघमी                  14.30%
6  मोहा            2.192 दलघमी                  14.19%
7) मालेवाडी       1.350 दलघमी                  00%
8) गोपाळपूर       1.310दलघमी                  12.21%
9) करेवाडी सा.त. 1.000 दलघमी                 26.40%
10) दैठणा सा.त. 1.651 दलघमी                  00%
एकुण उपयुक्त पाणीसाठा:-0.970 दलघमी, एकुण उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी:-5.70
…………………..…………………………

◾परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण प्रकल्प हा परळी शहर व तालुक्यातील सुमारे १६ गावा साठी मोठा आधार आहे. रब्बी हंगामासाठी या धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठाही केला जातो. वाण धरणात 28 डिसेंबर 2023 रोजीच्या अहवालानुसार वाण प्रकल्प 67.72%, बोरणा येथील मध्यम प्रकल्पात 00% तर बोधेगाव येथील मध्यम प्रकल्पात 12.41% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. परळी तालुक्यातील चांदापूर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, खोडवा सावरगाव, कातकरवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपूर, करेवाडी साठवण तलाव, दैठणा साठवण तलाव या 10 लघु मध्यम प्रकल्पात केवळ 5.70% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
…………………………………………………

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा दलघमी

1) वाण धरण
स्थापित क्षमता –19.717 दलघमी
मृतसाठा – 0.397 दलघमी
उपयुक्त जलसाठा – 312 दलघमी
उपयुक्त साठा टक्केवारी =67.76%

2) बोरणा मध्यम प्रकल्प
स्थापित क्षमता-4.199
मृतसाठा-0.549
उपयुक्त पाणी साठा=8.972 दलघमी.
उपयुक्त टक्केवारी =00%

3) बोधेगाव मध्यम प्रकल्प.
स्थापित क्षमता-10.814
मृतसाठा-1.842
उपयुक्त साठा=3.650 दलघमी.
उपयुक्त साठा टक्केवारी =12.41%