🔷 सामाजिक/ वधू-वर परिचय मेळावा.
बीड/परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क – वीरशैव समाज परळी वैजनाथ व महाराष्ट्र वीरशैव सभा,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव विकास प्रतिष्ठान परळी वै.द्वारा आयोजित ६व्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा निमित्त संत गुरुलिंग स्वामी मठ,बेलवाडी येथे महिला पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात संपन्न झाली.
सदरील बैठक वीरशैव समाजाच्या ज्येष्ठ महिला प्रतिनिधी तथा वैद्यनाथ बँकेच्या संचालिका सुरेखाताई मेनकुदळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि.०२ जाने. मंगळवार रोजी दु.४:००वा संपन्न झाली.या वेळी सर्वांना मार्गदर्शन करताना त्यांनी वीरशैव व समाजातील सर्व पोटजातीतील वधू वरांनी परळी शहरात दि.०७ जानेवारी २०२३ रविवार रोजी संपन्न होत असलेल्या ६ व्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात अधिकाधिक संख्येने नोंदणी करावी असे आवाहन केले.
प्रतिवर्षी या मेळाव्यात ५०० ते ६०० वधू-वर यांची नोंदणी होत आली आहे.यावर्षी देखील असाच प्रतिसाद सर्वांकडून मिळेल असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.सदरील मेळाव्याच्या कार्य व नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून परळी व पंचक्रोशीत या मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्व वीरशैव बंधू भगिनी कार्यरत आहेत.
यावेळी बैठकीत वधु वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष महादेव ईटके, सचिव सुधीर फुलारी सर,चंद्रकांत उदगीरकर, शिवकुमार केदारी, सुशील हरंगुळे ,महिला उपाध्यक्ष उज्वला आलदे,सहसचिव कोमल बेलुरे,शिवकुमार चौंडे,दत्ता गोपानपाळे,संजय कोरे तसेच महिला पदाधिकारी गोदावरीबाई चौधरी,मनीषा चौंडे,मंगल देशमाने,उज्वला काटकर,सुवर्णा खानापुरे,रेखा वाघमारे,रमा आलदे,गायत्री वाडेवाले,उमा चौधरी,शिवकन्या स्वामी,ज्योती बुद्रे,रंजना चौंडे,रत्नमाला सोरडगे,शिवकन्या बुद्रे,शकुंतला अष्टेकर,रुक्मिणी पालकर,प्रेमला रेवडकर,सिंधू स्वामी,सत्यवती बुरांडे ,विजया राडकर,प्रसन्ना संकाये,जयश्री पोखरकर,लक्ष्मी, मीरा आदी महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक संयोजन समितीचे उपाध्यक्ष सचिन स्वामी, तर आभार प्रदर्शन संयोजन समिती कोषाध्यक्ष सुशील हरंगुळे यांनी केले.