दै. मुंबई हलचल चे संपादक दिलशाद खान यांचा हस्ते आयुष्मान भारत कार्ड वाटप

🔷 आयुष्यमान भारत

मुंबई/एम एन सी न्यूज नेटवर्क(रमाकांत मुंडे)  : नेहरु युवा केंद्र (मुंबई) आणि त्यांची सहयोगी संस्था त्रिरत्न प्रेरणा मंडल, साई शिक्षा फाउंडेशन, एम.ए.सी. फाउंडेशन, श्री माऊली शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून त्रिरत्न भवन,सांताक्रुज पश्चिम, खोतवडी येथे १७/१२/२०२३ ला आयुष्मान भारत योजना कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आणि त्याचे वाटप कार्यक्रम दि: ०१/०१/२०२४ नवीन वर्षाच्या संध्याकाळी ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात दै. मुंबई हलचल चे संपादक दिलशाद एस. खान हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आयुष्मान भारत कार्ड येथील लोकांना वाटप करण्यात आले.

या सामाजिक कार्यक्रमाचे सहयोगी प्रकाश मनोरे (झोनल डायरेक्टर एन.वाय.के.एस. महाराष्ट्र), नीसांन्त रौतेला जी (डी.वाय.ओ. मुंबई एन.वाय.के.), मॅडम ज्योती रानी, सर संजय जाधव, सर मदन घेपाटे एन.वाय.के. – एन.वाय.के.एस. आणि या सामाजिक कार्यक्रमाचे विशेष मानकरी आयुष्मान कार्ड बनविणारे प्रमोद जैसवाल, मॅडम मनीषा टेमकर, सर प्रशांत जाधव, दिलीप कदम, दयानंद मोहीते , रवी शीरके, प्रशांत पवार, प्रीया जाधव यांनी मोठें योगदान दिले. आयुष्मान भारत कार्ड वाटप वेळी खलील शेख , संतोष कुवेकर, मॅडम रेश्मा पांचाळ, भानुदास सोनावने, सैलेद्र जाधव, मॉम रेखा जाधव, मनोज कुमार आणि येथील स्थानिक रहिवासी उपस्थित होते. नव वर्षाच्या दिवस रोजी आपल्याला आयुष्यमान कार्ड मिळाले याचे आनंद ही नागरिकांनी केला.