🔷 व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने दर्पण दिन साजरा
बीड/परळी-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – परळी शहर तालुक्यात सक्रिय असणार्या पत्रकारांना घरे व इतर सुविधा मिळाव्यात यासाठी नोंदणीकृत असलेल्या सदस्यासह नविन सदस्यांना समाविष्ट करुन पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी व्यापक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन परळी पत्रकार संघ मर्या.परळीचे अध्यक्ष मोहन व्हावळे यांनी केले.व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने दर्पण दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
दर्पण दिनानिमीत्त व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतिने शनिवार दि.6 जानेवारी रोजी जीजामाता उद्यानात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यानिमीत्त सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर दर्पणदिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना परळी पत्रकार संघ मर्या.चे अध्यक्ष मोहन व्हावळे म्हणाले की,परळीतील पत्रकारांना आपल्या हक्काचे घर असावे यासाठी परळीतील आम्ही पत्रकारांनी रजिस्टर संस्था स्थापन करत गृहनिर्माण संस्थेसाठी परळी नगरपालिकेकडुन नंदागौळ मार्गावरील जुन्या कचरा डेपोची जागा मंजुर करुन घेतली.परंतु काही कारणास्तव याबाबत पुढील प्रक्रिया पुर्ण होवु शकली नाही.
परळी शहरातील पत्रकारांच्या घरांचे प्रश्न बिकट बनत चालले असल्याने आगामी काळात रजिस्टर असलेल्या संस्थेतील सदस्य व गृहनिर्माण संस्थेसाठी शहरातील सक्रिय असणार्या पत्रकारांना नव्याने सदस्य करुन गृहनिर्माण संस्थेचा प्रश्न मार्गी लावु असे सांगितले.यावेळी पत्रकार दत्तात्रय काळे यांनी मराठी भाषेतील पहिले वृतपत्र सुरु करणार्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले.यावेळी व्हाईस ऑफ मिडीया महिला प्रदेशाध्यक्ष सुकेशिनी नाईकवाडे,परळी तालुकाध्यक्ष स्वानंद पाटिल,धनंजय आढाव,संजीव रॉय,संभाजी मुंडे,किरण धोंड,महादेव शिंदे,संतोष जुजगर,बालाजी ढगे,विकास वाघमारे आदी उपस्थित होते.
