राज्यस्तरीय वीरशैव वधु वर परिचय मेळावा संपन्न

🔷 मान्यवरांच्या हस्ते वधु-वर संकेतस्थळाचे उद्घाटन
बीड/ परळी /वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क–  शहरात वीरशैव समाज परळी , महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे यांच्या प्रेरणे व विकास प्रतिष्ठान परळी वैजनाथ द्वारा संचलित ६ राज्यस्तरीय वीरशैव वधू वर परिचय मेळावा श्री संत गुरुलिंग स्वामी संस्थान ,बेलवाडी येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे चे प्रदेशाध्यक्ष प्रा. रमेश आवटे चाळीसगाव तर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे चे सरचिटणीस श्री बाळासाहेब होनराव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट बी. आर. सोनटक्के , माजलगाव चे आर. जी कानडे , श्री सोमनाथ आप्पा कुरमुडे , महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी, महाराष्ट्र वीरशैव सभेचे प्रांतिक सदस्य विजयकुमारजी मेनकुदळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथप्पा हालगे, माजी नगरसेविका उमाताई समशेट्टे , सुरेखाताई मेनकुदळे, माजी नगराध्यक्ष सरोजिनीताई हालगे, सुधीर फुलारी सर आदिंची  प्रमुख उपस्थिती होती .
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्यक्ष भेटीद्वारे वधू वर शोधणे अत्यंत जिकरीचे झाले आहे अशा परिचय मेळाव्यामुळे हे काम अधिक सोपे झाले आहे वधू वराचे संकेतस्थळ करून परळीकरांनी वधू वर निवडीचे काम अधिक सोपे केले असल्याने ते कौतुकास पात्र आहेत अशी भावना प्रा.आवटे सरांनी व्यक्त केली तर वधू वर नोंदणी घेताना येणाऱ्या कायदेशीर अडचणीवर व वाढत्या घटस्फोट प्रकारावर अध्यक्ष श्री बाळासाहेब होनराव यांनी चिंता व्यक्त करून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. श्री आर जी कानडे यांनी परळीतील सर्व उपक्रमांना मी स्वतः उपस्थित राहून योगदान देत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष श्री दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी प्रास्ताविक केले.  श्री संजय स्वामी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सचिन स्वामी यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाची माहिती दिली. आभार प्रदर्शन माजी नगराध्यक्ष श्री सोमनाथप्पा हालगे यांनी केले. यावर्षी नव्याने सुरू केलेल्या लक्की ड्रॉ उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. वधू आणि वर  यानी स्टेजवर प्रत्यक्ष हजर राहून परिचय दिला.
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष महादेव इटके, श्याम बूद्रे नागेश हालगे चंद्रकांत उदगीरकर सुशील हरंगुळे शिवकुमार चौंडे, सौ उज्वला आलदे, सौ कोमल बेलूरे, शिवकुमार केदारी, विकास हालगे, प्रकाश खोत, दत्तात्रय गोपनपाळे, उमाकांत पोपडे, सतीश रेवडकर , गजानन हालगे , प्रभाकरआप्पा इटके, संदीप तीळकरी ,सुदाम कापसे ,अनिरुद्ध स्वामी , प्रभूआप्पा कापसे, प्रकाश घनचक्कर ,नागेश हत्ते, गौरीशंकर मोदी, शिरीष चौधरी, प्रा. उमाकांत कुरे, श्रद्धा नरेश हालगे, मनीषा चौंडे ,अनिता खोत, संगीता रेवडकर, ज्योति लिंगाडे, जयदेवी पोपडे, शिवानी वारद, अनिता पत्रावळे,  अमृता चौधरी ,सविता चौधरी, महानंदा उदगीरकर ,उज्वला काटकर ,दुर्गा हरंगुळे, सुवर्णा ओपले, मंगल देशमाने, संगीता सपाटे, माया ओपले, रंजना खोत, रंजना चौंडे, प्रसन्ना संकाये, रेखाताई वाघमारे, रमाताई आलदे, शांताबाई कापसे, आदी सह मेळावा संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी समाज बांधव महिला वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.