उत्तरेकडील चार राज्यांमध्ये थंडीची लाट, इशारा

PC- weather & radar

रेल्वे सेवा प्रभावित,  गाड्याना मोठा विलंब
◾अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याचा अंदाज; ◾शाळांच्या सुट्या पुढें वाढल्या

नवी दिल्ली– देशांत उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढतो आहे . पंजाब, हरियाणा-चंदीगड, दिल्ली आणि शेजारी राजस्थानमध्ये थंडीचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. यापैकी अनेक भागात आज तापमान सुमारें ८ ते१० अंश राहण्याची शक्यता आहे.

कडाक्याची थंडी असल्याने उत्तर प्रदेश आणि दिल्लीत शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली असून उत्तर प्रदेश मध्ये माध्यमिक ८ वीपर्यंतच्या सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये येत्या १० तारखे पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीत पाचवीपर्यंतच्या शाळा १२ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह उत्तर, मध्य आणि ईशान्येकडील १४ राज्यांमध्ये दाट धुक्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे अनेक रेल्वे एक्सप्रेस गाड्या विलंबाने दिल्ली कडे धावत आहेत.अनेक राज्यात दाट धुके ही दिसून येते आहे. दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमधील काही शहरांमध्ये दृश्यमानता खूपच कमी झाली आहे.वातावरनातील मोठया प्रमाणावर होत असलेल्या बदलामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये आज काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

हवामान अंदाज- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ८ जानेवारी (सोमवार) पासून उत्तर-पश्चिम भारतात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येईल. त्यामुळे ८ आणि ९ जानेवारीला जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.