शहर स्त्रीभ्रूण हत्ये मध्ये अगोदरच बदनाम , पोनि हेमंत कदम यांनी तात्काळ धाव घेतल्याने चिमूकलीचे वाचले प्राण
बीड /परळी वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क- :- परळी तालुक्यातील मालेवाडी रस्त्यावर शहरापासून सुमारें सहा किलोमीटर अंतरावर अज्ञात निर्दयी मातेने एका आठ महिन्याच्या मुलीस प्लास्टिक पांढऱ्या रंगाच्या पोत्यात गुंडाळून फेकल्याची खळबळजनक घटना अज्ञात व्यक्ती ने फोनद्वारे दिलेल्या खबरी मुळे उघडकीस आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळ गाठुन मुलीस ताब्यात घेत परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदर मुलीवर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार सुरू आहेत. बऱ्याच कालावधीनंतर शहरात स्त्री जातीचे बाळ रस्त्यावर फेकण्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ८ जानेवारी २०२४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की, मालेवाडी रस्त्या लगत एक मुलगी पोत्यात गुंडाळून फेकलेली आहे, कुणी फेकली माहित नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, व पोलीस जमादार सुनील अन्नमवार यांच्यासह घटनास्थळी पोहोचले.तेंव्हा सुमारें आठ ते नऊ महिने वयाची मुलगी प्लास्टिक पांढऱ्या पोत्यात खाली डोके अन वर पाय या स्थितीत लाल रंगाचा बेडशिट व मध्ये पोत्यात गुंडाळी केलेली दिसून आली. तीच शरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत आढळून आली. खूप रडल्यामुळे ती गलीतगात्र झाली होती.
पोनी हेमंत कदम यांनी तात्काळ सदर मुलीस परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तुकाराम गुट्टे, ब्रदर मगन वसावे, संजय वरवटकर, सिस्टर गायकवाड आणि मुलीवर ताबडतोब उपचार सुरू केले. दाखल फारच अशक्त दिसतं होती. उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार करून अधिक उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे च महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखे खाली ती आहे.आता ती धोक्या बाहेर असल्याचे डॉक्टरानी सांगितले.
सदर घटनेने मालेवाडी परिसर आणि तालुक्यात खळबळ माजली असून ती निर्दयी माता कोण याचा तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम करीत आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस जमादार सुनील अन्नमवार यांच्या मुळे सदर मुलीस जीवदान मिळाले आहे.
दरम्यानन या घटने प्रकरणी ग्रामीण पोलिसात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून गु.र 10/2024 कलम 317 भा द वी ., अधिक तपास हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.